Harshali Pawar cleared the State Public Service Commission examination for the post of Excise Department Sub-Inspector. Vandana and Nimba Pawar worshiping Harshali. esakal
नाशिक

Success Story : कृषिकन्या बनली उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर (जि. नाशिक) : माय मातीच्या कष्टाला यशाचा सुगंध नक्कीच दरवळतो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन वंदना व निंबा पवार या शेतकरी दाम्पत्याची कन्या हर्षाली पवार स्पर्धा परिक्षेतून अधिकारी बनली आहे. सौंदाणे (ता. मालेगाव) येथील हर्षालीने राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाला गवसणी घातल्याने तिचे कौतुक होत आहे. (Success Story of Farmer girl became secondary Registrar in Excise Department Nashik News)

शैक्षणिकदृष्ट्या स्पर्धा परिक्षेत मोठ्या प्रमाणावर मुलींची चूणूक दिसून येते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या खडतर परिश्रमाला यशाचे कोंदण लाभत आहे. स्पर्धा परिक्षेतील आजवर यशस्वी विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून शिक्षण घेऊन पुढे आले आहेत. हर्षालीने गावातील मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण, तर जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत केबीएच कनिष्ठ महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाली. बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना सुट्टीच्या दिवशी आईला मदत करण्यासह शेतीतील कामेही हर्षाली करत होती.

आई- वडील शेतकरी असले तरी पुरोगामी विचारसरणीचे असल्याने लेकीने खूप शिकावे, अशी इच्छा असल्याने जळगाव येथील कृषी महाविद्यालयात बी. एस्सी. ॲग्री पदवी संपादन करून स्पर्धा परिक्षेतून अधिकारी होण्याचा चंग बांधला. उच्च शिक्षण घेण्याची जिद्द असली तरी संघर्ष हा नित्याचाच. त्यात मार्ग काढून अभ्यास सुरू ठेवला. कोरोना परिस्थितीत जगाबरोबर परिक्षा रद्द झाल्या. त्याकडे संधी म्हणून बघितले. परीक्षांची अनिश्‍चितता होती.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

या काळात आई- वडीलांसह मैत्रीणींचे भावनिक, मानसिक पाठबळ भक्कम आधार ठरल्याचे हर्षालीने सांगितले. यशाला हजार बाप असतात. अपयश अनाथ असते, असे सांगत भविष्यातील अनेक परिक्षांची तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले. स्पर्धा परिक्षेतील या प्रवासात मार्गदर्शक गुरुजण, दोन्ही बहिणी, नातलग, मित्र- मैत्रीणींची प्रेरणा उपयुक्त ठरली आहे.

"स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत निर्णय घेताना सर्वांगीण विचार करावा. फक्त यशोगाथा वाचून, ऐकून मला अधिकारी व्हायचे अशी धारणा न ठेवता खडतर अभ्यासाची तयारी ठेवावी. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. यश तुमची वाट पाहत आहे."

- हर्षाली पवार, दुय्यम निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

"शेती मातीशी इमान राखून लेकी कष्टकरी बापाला आधार ठरतात. शिक्षण घेतांना शेतीची कामेही करतात. मुळ प्रपंच व संघर्ष न विसरता परिश्रम करतात. त्यामुळेच यशाचे शिखर गाठतात. मुलीने अजून मोठ्या पदासाठी परीक्षा द्यावी."
- निंबा पवार, वडील, सौंदाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT