Prabhakar Aher felicitating Prasad Aher for passing second position in competitive examination in sportsman category esakal
नाशिक

Success Story : निवाणेच्या ‘प्रसाद’ची पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी!

प्रसादच्या या यशाबद्दल प्रजासत्ताक दिनी निवाणे ग्रामस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

निवाणे : निवाणे (ता. कळवण) सारख्या ग्रामीण भागातून प्रसाद श्रावण आहेर याने खेळाडू प्रवर्गात महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांकाने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली.

प्रसादच्या या यशाबद्दल प्रजासत्ताक दिनी निवाणे ग्रामस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला. (Success Story Prasad aher from nivane achieve post of Deputy Collector in first attempt mpsc exam nashik news)

प्रसादचे शिक्षण कळवण येथे झाले. त्यास खेळाची आवड असल्याने तो रायफल शुटींग ५ वेळा राष्टीय स्तरावर खेळला असून त्याने दोन वेळा सुवर्णपदक पटकाविले आहे. यानंतर प्रसादची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी (NDA) मध्ये निवड झाली.

येथेही तो पहिल्याच प्रयत्ना उर्त्तीण होत देशात त्याने सहा लाख विद्यार्थ्यांमधून १९० वा क्रमांक पटकाविला. परंतु काही कारणास्तव त्याने प्रशिक्षण सोडून दिले.

त्यानंतर २०१८ पासून प्रसादने लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला. मात्र तीन प्रयत्न करून त्याला यश आले नाही. अखेर २०२२ साली त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यात तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला.

यावेळी प्रभाकर आहेर, बाळासाहेब आहेर, खंडेराव आहेर, समाधान आहेर, अॅड. मनोज शिंदे, निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कौतिकराव आहेर, सरपंच जयश्री आहेर, ग्रामपंचायत सदस्य राहुल आहेर, सुनीता आहेर, दिनकर आहेर, ग्रामसेवक दिलीप आहेर, मुख्याध्यापिका अनिता पाटील, शिक्षिका संगीता आहेर, संजय देवरे, अशोक आहेर, वसंत आहेर, डॉ. दीपक आहेर, अॅड. राकेश पाटील, शिवाजी आहेर, कविता आहेर, रत्ना अहिरे, नर्मदा आहेर, सविता हिरे, सुमन शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT