Success Story : यश मिळवायला वयाची मर्यादा नसते, हे वाक्य पूर्वी अशक्य वाटायचं. पण आता अलीकडच्या काळात अत्यंत कमी वयामध्येही यश मिळवणारी उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
त्यामुळे वय, शिक्षण व यश याला आता कुठलेही बंधन राहिलेले नाही. अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी राज के. आझाद या विद्यार्थ्याने ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये अभूतपूर्व यश मिळवून यशाचा राजमार्ग निर्माण केला आहे. (Success Story raj azad Discovered royal way to success at early age business at 19 recognizing Goggle craze nashik news)
राजचे बारावी पर्यंतचे शिक्षण विस्डम हाय नाशिक येथे झाले. त्यानंतर बीबीए सुरू असतानाच वयाच्या १९ व्या वर्षी ऑनलाइन विक्री माध्यमातून गॉगल हे प्रॉडक्ट विक्रीसाठी लॉन्च केले. किंमत उच्च, गुणवत्ता, तत्पर सेवा, व्यवहारातील पारदर्शकतेच्या जोरावर अल्पावधीतच यश मिळाले.
अवघ्या तीस हजार रुपये भांडवलावर सुरू केलेले प्रोजेक्ट शेड्स ऑनलाइन सेल्स फर्म एका वर्षभरात दिवसाला तीस हजार रुपये उत्पन्न त्यास मिळवून देत आहे. देशात व परदेशात सुद्धा आतापर्यंत जवळपास पाच हजाराहून अधिक गॉगल्स विक्री झालेले आहे.
आठशे रुपयापासून ते दोन हजार रुपयांपर्यंतचे जेन्ट्स व लेडीज गॉगलच्या असंख्य व्हरायटी त्याने लॉन्च केल्या आहेत. फॅशनचा ट्रेंड कसा बदलत आहे, त्यानुसार त्याच्या डिझाइन, ग्लास व कलरमध्ये विविध प्रयोग उद्योगात होत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
अन् व्यवसायात घेतली उडी
आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल राज सांगताना हरखून जातो. वडील के. एस. आझाद हे नाशिकमधील सुप्रसिद्ध क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आहे. त्यांनी मला जे आवडेल त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कॉलेज सुरू असताना ऑनलाइन शॉपिंग ट्रेडिंगमध्ये त्याने मार्केटचा ट्रेंड काय आहे, युवा- युवतींना सध्या फॅशनमध्ये काय आवडते याचा अभ्यास केल्यानंतर गॉगलची सध्या क्रेझ असल्याचे राजच्या लक्षात आले. परंतु, गॉगल सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये दोनच प्रकारचे उपलब्ध आहेत.
एक तर रस्त्यावर विक्रीसाठी असलेले शंभर रुपयात किंवा दुकानांमध्ये पाच हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेले गॉगल. सातत्याने गॉगल वापरल्यास डोळ्यांचे संभावित आजार, धोके टाळता येतात. हे त्याने निरखले आणि व्यवसायात उडी घेतली. त्याने अभ्यास करून विविध प्रकारच्या व्हरायटी असलेले गॉगल लॉन्च केले.
"शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरची संधी शोधण्यापेक्षा शिक्षण सुरू असतानाच व्यवसायात सक्रिय व्हावे. आपल्या आवडत्या क्षेत्रात व जिथे व्याप्ती आहे तेथे प्रयत्न करून लवकर सुरवात करावी. लवकर सुरवात केल्यास तितकेच लवकर आपणास यश मिळेल."-राज आझाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.