Villagers present to felicitate Shreya Dilip Thackeray who joined the Indian Navy as an Air Engineer.  
नाशिक

Success Story: सोनीसांगवीची श्रेया ठाकरे नौदलात ‘एअर इंजिनिअर'! जिद्द अन् चिकाटीने मिळविले यश

भाऊसाहेब गोसावी

Success Story: देशासाठी काहीतरी करायचे असा निश्‍चय करीत नियोजन, सातत्य, संयम आणि संघर्षाला जिद्दीसह चिकाटीची जोड देत सोनीसांगवी (ता. चांदवड) येथील श्रेया दिलीप ठाकरे भारतीय नौदलात एअर इंजिनिअर म्हणून भरती झाली.

ओडिशामधील नौदलाच्या आय. एन. एस. चिल्का येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत ती कार्यरत झाली आहे. तिच्या या यशाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. (Success Story Shreya Thackeray Join Indian Navy as Air Engineer nashik news)

ध्येयाला गवसणी घालण्यासाठी श्रेया मेहनत करीत होती. नौदलातील भरतीसाठी तिने अर्ज केला. पदासाठी आवश्‍यक असलेली शारीरिक आणि लेखी परीक्षेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. निवड यादीत आपले नाव पाहिल्यावर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. विविध संस्था, मिलिटरी महाविद्यालयातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.

श्रेयाची नेमणूक केरळमधील कोची येथे झाली आहे. नौदलाच्या गणवेशात श्रेया घरी आल्यावर फटाके वाजवीत आणि फुलांची उधळण करीत ग्रामस्थांनी तिचे स्वागत केले. आई-वडिलांसह कुटुंबातील प्रत्येकाचे मार्गदर्शन श्रेया मोलाचे ठरले. ग्रामीण भागातील तरुणींसाठी श्रेयाचे यश प्रेरणादायी ठरणार आहे.

सोनीसांगवीच्या सर्वसामान्य कुटुंबातील श्रेयाने शालेय जीवनात देशसेवेसाठी नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत, तर उच्च माध्यमिक शिक्षण नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेत झाले. तिचे आजोबा रामचंद्र ठाकरे हे मराठा प्रसारक समाज संस्थेचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचे श्रेयाला मार्गदर्शन लाभले. वडील दिलीप ठाकरे हे खासगी कंपनीत आहेत. आई ‘मविप्र'मध्ये शिक्षिका आहेत.

"अथक प्रयत्नांचे फळ श्रेयाला मिळाले. आमच्या कुटुंबातील पहिल्या सदस्याने देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतल्याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे." - दिलीप ठाकरे, श्रेयाचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT