देशसेवेची अतीव ओढ, जिद्द, चिकाटी आणि प्रचंड परिश्रम याची सांगड घालत सोनेवाडी बुद्रुक (ता. निफाड) येथील शेतकरी कुटुंबातील सैनिक संतोष सखाहरी निफाडे एनएसजी कमांडो बनला आहे. (Success Story Sonewadi Santosh Nifade became an NSG commando Success achieved through hard work and determination nashik)
कष्ट यशाला गवसणी घालण्यासाठी पुरेसे असतात, असे म्हटले जाते. ‘जितना बडा संघर्ष होगा, उतनी ही शानदार जीत होगी’, या उक्तीचा प्रत्यय त्याच्या यशाने निफाड तालुक्यात आला. शेतकरी कुटुंब. त्यामुळे परिस्थिती हलाखीची.
संतोष अभ्यासात हुशार मात्र इतर आर्थिकप्राप्तीची नोकरी न स्वीकारता देशसेवा करण्याचा त्याचा ठाम निर्धार. कुटुंबीयांनी विरोध न करता त्याच्या इच्छेला वाव दिला. त्यानुसार त्याने सैन्यभरतीत जायचे ठरवले व जून २००६ ला त्याची निवडही झाली.
त्याच्या १४ मराठा बटालियनमधील निवडीनंतर बेळगाव (कर्नाटक) येथे एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर त्याची शिपाई म्हणून ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे पोस्टींग झाली.
त्यानंतर सियाचीन ग्लेशियर २ वर्ष, जम्मू आणि काश्मीर ३ वर्ष, गुजरात ३ वर्ष, लडाख २ वर्ष, पुन्हा जम्मू आणि काश्मीर ३ वर्ष, जम्मू ३ वर्ष, अशी १७ वर्षे त्याने देशसेवा केली.
या काळात त्याने देशसेवेचे आव्हान पेलत अंतर्गत परीक्षा देत निवृत्तीपर्यंत लान्सनायक, हवालदार या पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर निवृत्ती न स्वीकारता नवीन आव्हान पेलत एनएसजी कमांडो होण्याचे स्वप्न मनाशी बाळगत एनएसजी ट्रेनिंगसाठी दिल्ली गाठली.
या खडतर ट्रेनिंगमध्ये मध्यरात्री साडेतीनला उठून रात्री बारा किंवा एकपर्यंत, असे सुमारे २० तास ट्रेनिंग केले. रात्री केवळ केवळ साडेतीन तास विश्रांती मिळत असे. या ट्रेनिंगमध्ये देशभरातील ६५० जवान सामील झाले होते.
खडतर ट्रेनिगमुळे केवळ २९५ जवान राहिले. त्यात संपूर्ण भारतातून उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करून संतोषची झालेली निवड ही निफाड तालुक्याच्या दृष्टीने नक्कीच अभिमानस्पद आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.