Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मे महिन्यात जाहीर झाला होता. अखिल भारतीय सेवांसाठी या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे.
यात परीक्षेत यशाची हॅट्ट्रिक करणाऱ्या स्वप्नील पवार यांनी अखेर ‘आयएएस’ होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे, तर गौरव कायंदे-पाटील यांना आयपीएस केडर मिळाले आहे. (success story Swapnil Pawar finally become an IAS nashik news)
यूपीएससीतर्फे मे महिन्यात निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना अखिल भारतीय सेवांसाठी निवडीची (सर्व्हिस ॲलोकेशन)ची प्रतीक्षा होती. राष्ट्रीय क्रमवारी, राखीव प्रवर्ग, तसेच उपलब्ध असलेल्या जागा व त्यावरील आरक्षण यांच्या आधारे ही यादी नुकतीच निश्चित करण्यात आलेली आहे.
यामध्ये स्वप्नील पवार यांना सनदी अधिकारी अर्थात ‘आयएएस’ केडर मिळालेले आहे. यापूर्वी पहिल्याच प्रयत्नात २०२० मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना अखिल भारतीय रेल्वे सेवेकरिता निवड झाली होती. लागलीच २०२१ मध्ये परीक्षा उत्तीर्ण होताना क्रमवारीत सुधारणा केल्याने त्यांची अखिल भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) याकरिता निवड करण्यात आली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सनदी अधिकारी होण्याच्या स्वप्नांचा पाठलाग करताना, ‘आयपीएस’चे प्रशिक्षण सुरू असतानाच त्यांनी २०२२ मधील नागरी सेवा परीक्षेत यशस्वी कामगिरी करताना हॅट्ट्रिक केली. यासोबत क्रमवारीत सुधारणा केल्याने यंदा त्यांची निवड अखिल भारतीय प्रशासकीय सेवेत झालेली आहे.
अत्यंत खडतर परिस्थितीतून वाटचाल करताना अभियांत्रिकीचे शिक्षण घेत व पुढे स्पर्धा परीक्षांना सामोरे जात त्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. दरम्यान, यूपीएससी २०२२ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गौरव कायंदे-पाटील यांची निवड अखिल भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) याकरिता झालेली आहे.
पवार कुटुंबात दिवाळी
आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज करताना स्वप्नील पवार यांनी यशाला गवसणी घातली आहे. एरवी निकाल जाहीर झाल्यावर जल्लोष केला जात असताना, नुकताच आयपीएसपदावर निवड झाल्याने पवार कुटुंबीयांना दिवाळी साजरी करण्याची एक संधी उपलब्ध झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.