meenatai pathan esakal
नाशिक

Success Story : वणीच्या मीनाताई बनल्या महिला सक्षमीकरणाच्या दूत

विजयकुमार इंगळे

Success Story : आयुष्याच्या वाटचालीत समाजाचं देणं लागतो, या भावनेतून अनेक जण आपलं योगदान देत असतात.

संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या कुटुंबाच्या सदस्या होतानाच बालपणातच मिळालेलं समाजसेवेचं बाळकडू पुढे नेताना उपेक्षित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणतानाच महिलांच्या सक्षमीकरण चळवळीत उभ्या राहिल्या, त्या दिंडोरी तालुक्यातील वणी येथील मीनाताई पठाण. (Success Story wani Meenatai became an ambassador for women empowerment nashik)

मीना अंजुम रशीन शेख... शिक्षण बी.ए., माहेर वणी येथील, तर सासर कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील... वणी येथील जनाब गुरुजी यांना पत्नी जैबुन्नीसा यांच्यासह दोन मुली, दोन मुलं असं मोठं कुटुंब होतं.

बालपणापासूनच शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या मीनाताई यांच्यावरही असलेला सुसंस्कारांचा पगडा समाजासाठी पुढे येत राहिला.

मीनाताई बारावीत असतानाच त्यांचा विवाह जुनी बेज येथील रशीद नजीर शेख यांच्याशी झाला. सासरी शेख यांचंही मोठं कुटुंब. एकत्र कुटुंबपद्धतीत रमलेल्या मीनाताई यांच्यासाठी हा नक्कीच आनंदी क्षण राहिला.

भारतभ्रमंतीत फिरलं कुटुंब

पती रशीद शेख हे भारतीय सैन्यदलात लान्स नायक असल्याने त्यांच्याबरोबर मीनाताई यांचंही विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर बदलीनिमित्त फिरत राहिलं. दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेशसह अन्यही राज्यांमध्ये सैन्यदलात जबाबदारीच्या पदावर असलेल्या रशीद शेख यांनी मीनाताई यांना नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

त्यासाठी त्यांनी मीनाताई यांना माहेरी राहून शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली. माहेरी वणी येथे असताना मीनाताई यांनी बारावीनंतरच्या शिक्षणासाठी प्रवेश घेत बी.ए.ची पदवी घेतली.

शिक्षणाबरोबरच परिसरातील अनेक लहान-मोठ्या उपक्रमांत सहभाग घेतानाच महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. वडील जनाब गुरुजी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब असलेल्या कुटुंबांना प्रोत्साहन देत शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बचतगटांसाठी बनल्या आधार

वणी शहराबरोबरच परिसरातील महिलांसाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या गेलेल्या बचत गटांसाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या प्रयत्नांतून परिसरातील अनेक गावांमध्ये बचत गटांच्या स्थापनेपासून, तर शासकीय योजनांची माहिती पोचवितानाच कागदपत्रांसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मीनाताई या नेहमीच तत्पर असतात.

बचतगटांच्या माध्यमातून परिसरातील अनेक महिलांना रोजगारनिर्मितीबरोबरच आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. वणी शहराबरोबरच ग्रामीण भागातील असलेल्या जनसंपर्काच्या जोरावर महिलांसाठी चालता-बोलता मार्गदर्शक अशी त्यांनी प्रतिमा उभी केली आहे.

बचत गटांबरोबरच परिसरातील विधवा महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोचविण्यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. दिंडोरी तालुक्यातील वणी शहराशी जोडल्या गेलेल्या ८० खेड्यांशी असलेल्या जनसंपर्कातून त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले.

तनिष्का व्यासपीठामुळे उभी राहिली ओळख

सामाजिक जाणिवेतून असलेल्या प्रयत्नांतून अनेक समाजोपयोगी उपक्रमात त्यांनी योगदान दिले. राज्यातील अर्धशक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आणि वाट चुकलेल्या भाविकांसाठी त्या मोलाच्या आधार ठरल्या आहेत.

अनेकदा प्रवासात पैसे चोरीला गेलेल्या तसेच कौटुंबिक कलहातून घर सोडलेल्या वाटसरूंसाठी मदतीबरोबरच समुपदेशन करीत अनेक कुटुंबांसाठी त्यांनी घरवापसी करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

सामाजिक कार्यात सहभाग नोंदवितानाच ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाच्या गटप्रमुख म्हणूनही अनेक उपक्रम त्यांनी वणी परिसरात राबविले आहेत.

वणी शहरात वृक्षभिशी, तनिष्का कपडा बँक याबरोबरच प्रसिद्धीपासून लांब असलेल्या महिलांच्या उपक्रमाची दखल घेतानाच महिलांसाठी उपक्रम राबविण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरलेय. तनिष्का व्यासपीठाने दिलेली संधी आयुष्यात स्वतःची ओळख उभी करण्यासाठी मोलाची ठरल्याचे मीनाताई अभिमानाने सांगतात.

विक्री सेंटर उभं करायचंय...

धार्मिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या वणी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन बचत गट तसेच तनिष्का गटांनी तयार केलेल्या हँडमेड वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, यासाठी मीनाताई पठाण यांचे शहरात तनिष्का वस्तू विक्री केंद्राच्या स्थापनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

आयुष्यातील सामाजिक वाटचाल भक्कम करताना ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाबरोबरच माहेर व सासरच्या परिवारासमवेतच दिंडोरी तालुका तनिष्का आमदार ज्योतीताई देशमुख, दिगंबर पाटोळे, तनिष्का गटप्रमुख नगमा शेख, गटप्रमुख सविता सोमवंशी यांच्यासह मुले हारून व तबस्सुम शेख यांचेही पाठबळ मोलाचे असल्याचे त्या सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT