Father Anna Deore and mother Mangal Deore while appreciating Yogita for being selected for Agniveer recruitment esakal
नाशिक

Success Story: मालेगाव तालुक्यातील 'ती' कन्या ठरली जिल्ह्यातील पहिली अग्निवीर जवान!

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर : देशात कुठल्याच क्षेत्रात महिलांची कमी नाही. खडतर समजल्या जाणाऱ्या संरक्षणाच्या क्षेत्रातही आता तरूणी पुढे यायला सुरुवात झाली.

सोयगाव भागातील कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून योगिता आण्णा देवरे हीने भारतीय नौदलाची परिक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवेत दाखल झाली.

सैन्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अग्निवीरांच्या भरतीमध्ये मुलींनाही संधी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सैन्य दलासारख्या अवघड अशा सेवेत महिलांनी जाणं याबाबत असलेल्या अज्ञानपणास फाटा देऊन योगिताने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून जिल्ह्यातील पहिली महिला अग्निविर ठरली आहे. (Success Story yogita deore from Malegaon taluka became first agniveer indian army soldier in district nashik News)

लहानपणापासून अभ्यासात हुशार होती.दहावीत ८८टक्के तर बारावीत ७७ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या योगिताने बारावीनंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला.

देशसेवेची ओढ असल्याने आपण वेगळं काही तरी करू शकतो या भावनेने मुंबईत अग्नीवीर परिक्षा दिली. ओरिसा राज्यातील आयएनएस चिल्खा सेंटर येथे प्रशिक्षणासाठी गुरूवारी (ता.१७) रुजू झाली. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर महिला अग्निवीर म्हणून देश रक्षणासाठी सज्ज होणार आहे.

योगिताने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत हे सिद्ध करून दाखविले. हा प्रत्येक मुलीचा सन्मान असून,आई बापाच्या कष्टाचे चीज करत ही यशाची पताका फडकावली.

वडील आण्णा दामू देवरे हे निवृत्त जवान आहेत तर आई मंगल गृहिणी असून शेतीकामात कुटुंबियांना मदत करतात.देवरे कुटुंबिय मूळचे तालुक्यातील तळवाडे (ता.मालेगाव) येथील रहिवासी आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून मुलांच्या शिक्षणासाठी येथे वास्तव्यास आहेत.

योगिता हिच्या रूपाने जिल्ह्यातील पहिली अग्नीवीर होत भारतीय नौदलात मालेगाव तालुक्याचा झेंडा रोवला त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

अग्निवीर भरतीमध्ये निवड होणारी पहिली तरुणी

हिशा बघेल मूळची छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील बोरीगरका गावची रहिवासी हिशा बघेल ही २०२३ च्या अग्निवीर भरती होणारी पहिली तरुणी आहे. हिशाचे प्रशिक्षण देखील ओडिसातील चिल्का येथे झाले आहे.

हिशा ही एका रिक्षाचालकाची मुली असून पहिली महिला अग्निवीर होण्याचा बहुमान तिने मेहनत आणि हिंमतीच्या जोरावर मिळवला आहे. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.तिच्या वडिलांची बारा वर्षांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे.

"वडिलांची प्रेरणा घेत लहानपणापासून देशसेवा करण्याचे स्वप्न होते.माझ्या या निर्णयाला आईने भक्कम पाठिंबा दिला ही महत्त्वाची बाब ठरली. प्रशिक्षण व चार वर्षांच्या सेवेत कठोर परिश्रम घेऊन कायमस्वरूपी देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचा मानस आहे."

- योगिता देवरे,अग्निवीर तरुणी.

"मुली या बापाच्या आधार ठरतात पण माझी मुलगी देशाची आधार ठरावी ही तीची जिद्द आहे. नौदला सारख्या वेगळ्या क्षेत्राचे निवडी तिने केली. नक्कीच ग्रामीण भागातील अनेक मुलींना प्रेरक ठरणार आहे."- आण्णा देवरे, वडील, माजी सैनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT