मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील मसगा महाविद्यालय व पोलिस कवायत मैदानावर महान शिवभक्त पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीत श्री. शिव महापुराण कथा होणार आहे. २३ ते २९ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या कथेसाठी सुमारे सव्वा लाख भक्तगण बसू शकतील असा तीन लाख २० हजार स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप उभारण्याचे काम जोमाने सुरु आहे.
यातील सुमारे ६० हजार स्क्वेअर फुटाचा मंडप वॉटरप्रुफ असेल. ६ हजार स्क्वेअर फुटाचा मुख्य मंडप असेल. मंडप उभारणीसाठी मध्यप्रदेश व नागपूर येथून शेकडो मजूर येथे दाखल झाले आहेत. शिव महापुराण कथेविषयी उत्तर महाराष्ट्रात मोठी उत्सुकता आहे. राज्यासह परराज्यातील भाविकही कथासोहळ्यास येण्याची शक्यता आहे. (Successful preparation of Sri Shiva Mahapurana katha Possibility of coming of devotees from abroad along with state Nashik Latest Marathi News)
शिवसेनेचे युवानेते उत्तर महाराष्ट्र विस्तारक अविष्कार भुसे यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करुन मंडप पूजन व उभारणीस सुरवात झाली. पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा २३ डिसेंबरला दुपारी दोन ते पाच वेळेत असेल. २४ डिसेंबरला दुपारी एक ते चार, २५ ते २९ डिसेंबर दुपारी दोन ते पाच या वेळेत कथा होईल.
श्री. मिश्रा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथेला असंख्य भाविक उपस्थित राहतात. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. समितीतर्फे मंडप व व्यासपीठाचे भूमिपूजन नुकतेच झाले.
या वेळी पवन टिबडेवाल, आशिष अग्रवाल, नवनीत तापडिया, पिंटू कर्नावट, वासुदेव अग्रवाल, विवेक अग्रवाल, राजकुमार मुरारका, विशाल चौधरी, दामोदर पारीक, कैलास शर्मा, शशी दशपुते, मधुबाबा अग्रवाल, अजयकांत मंडावेवाला, निखिल बुरुड, दीपक मेहता, अमित संघवी, श्रीनिवास कलंत्री, अभय शिनकर, मुकेश शर्मा, राजकुमार मंडावेवाला, संजय मानधने, भरत देवरे, कैलास अग्रवाल, जगदीश काबरा, डॉ. जतीन कापडणीस आदींसह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
भाविकांनी फसवणूक, नुकसान टाळावे
श्री शिव महापुराण कथेसाठी पास मिळवून देतो, असे सांगून भक्तांकडून पैसे उकळण्याच्या तक्रारी येत आहेत. समितीसाठी सर्वभक्तगण सारखे आहेत. समिती असे कोणतेही पास देणार नाही. ज्यावेळी समिती निर्णय घेईल तत्पुर्वी तो कळविला जाईल. भाविकांनी अशा फसवणूक व भुलथापांना बळी पडू नये. भाविकांना कथा कोठूनही शांततेत ऐकता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
महाकथेला होणारी गर्दी लक्षात घेता महिला भाविकांनी कोणतेही मौल्यवान दागिने किंवा वस्तू सोबत आणू नयेत. नुकसान टाळावे. कथेसाठी ज्या भाविकांना सहयोग सेवा द्यायची असेल किंवा कार्यक्रमाविषयी काही माहिती हवी असल्यास त्यांनी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती, गगनगिरी कॉम्प्लेक्स, एकात्मता चौक येथील कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन समितीतर्फे श्री. टिबडेवाल, श्री. अग्रवाल यांनी केले आहे.
शिव महापुराण कथा तयारी
- शहराच्या मध्यवर्ती भागात मैदान
- तीन लाख २० हजार स्क्वेअर फुटाचा मंडप
- सव्वा लाख भाविकांची कथेसाठी सोय
- पार्किंग निवास व अन्य कामकाजासाठी २२ मैदान आरक्षित
- शंभरहून अधिक मोबाईल शौचालय
- स्वच्छतागृहांची तात्पुरती व्यवस्था
- नियोजनासाठी समितीच्या नियमित बैठका
- एलईडी स्क्रीनची सोय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.