नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीच्या वतीने शहरात चालवल्या जाणाऱ्या बसेस च्या चालक वाहकांनी आज सकाळी अचानक संपाचे हत्यार उपासले. अचानक झालेल्या संपाने सिटीलींक प्रशासन उजळून गेले नाशिक रोड आगारात व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी धाव घेऊन चालक व वाहकांशी बोलणे करून संपाचे कारण विचारले. (Sudden strike by Citylinc driver carriers Strike Stop after mediation Nashik Latest Marathi News)
सिटी लिंक प्रशासनाकडून चालक व वाहकांसाठी जाचक अटी असल्याने यातून काम कमी व मनस्ताप अधिक होत असल्याने संपाचे हत्यार उपसण्यात आले. तिकीट न फाडल्यास पाच हजार रुपयांचा दंड, एकाच वेळेस बसेस मध्ये चार ते पाच तिकीट चेकर यांच्याकडून तपासणी होणे वाहक व चालकांवर संशय घेणे यासारख्या प्रमुख तक्रारी बंड यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
येत्या सात दिवसात सर्व तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच संप करताना आगाऊ नोटीस देणे नियमानुसार बंधनकारक आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तात्काळ बसेस सुरू केल्या सिटी लंक कंपनीच्या वतीने सकाळी 200 व संध्याकाळी 200 अशा 400 बसेस चालविल्या जातात आज सकाळच्या सत्रात दोनशे बसेस रस्त्यावर धावल्याने साखर माने यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. सिटी लिंक कंपनीची स्थापना मागील वर्षी झाली आतापर्यंत सेवा सुरळीत असल्याचे दिसून आले मात्र आजच्या संपाने प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये अलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.