Sudhakar Badgujar Sakal
नाशिक

दुबार बोगस मतदारांमुळेच वाढले भाजपचे बळ; बडगुजर यांचा घणाघाती आरोप

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : केंद्रीयमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांच्यावर पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्याचे धाडस दाखविल्यानंतर देशभरात प्रकाशझोतात आलेले शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आता शहरात तब्बल अडीच लाखांपेक्षा अधिक बोगस दुबार मतदार नाव नोंदणीचा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दुबार नाव नोंदणीमुळेच भाजपचे ३ आमदार व मनपात ६६ नगरसेवक निवडून आल्याचा घणाघाती आरोप बडगुजर यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला आहे.


दुबार मतदार नोंदणी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांनंतर आता पोलिस आयुक्त व राज्य निवडणूक आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करणार आहे. हा सर्व घोटाळा बाहेर काढण्यासाठी शिवसेनेच्या १० जणांचा समावेश असलेल्या पथकाला सलग तीन महिने कठोर परिश्रम घ्यावे लागल्याची बाब यानिमित्ताने समोर आली. दुबार नावात शासकीय कर्मचाऱ्यांची नावे अधिक आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनी दोन ठिकाणी नावे नोंदवू नयेत आणि ती असल्यास कुठेतरी एकाच ठिकाणी नाव असायला हवी, असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांची दुबार नावे अधिक असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही घबराट आणि संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जी दुबार नावांची यादी सादर केली, ती महापालिका निवडणुकीपूर्वी निश्चितच वगळली जातील, असा विश्वास शिवसेना नेत्यांमधून सध्या व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांपर्यंतही ही बाब पोचविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


दुबार मतदार संख्या (एकूण : २ लाख ८७ हजार)

नाशिक पश्चिम : १ लाख २२ हजार २४२,
नाशिक पूर्व संघ : ८८ हजार ९३२
नाशिक मध्य संघ : ७६ हजार ३१९


नाशिक पश्चिम

नांदगाव (१२११७) मालेगाव (४५०७), मालेगाव बाह्य (११७१६), सिन्नर (८३९८), बागलाण (१२३५४), निफाड (९८८३), दिंडोरी (८६२४), नाशिक पूर्व (१२३५७), नाशिक मध्य (१२३४७) तर इगतपुरी ५३५३.


नाशिक पूर्व
नांदगाव (७८८६), मालेगाव मध्य (६५५), मालेगाव बाह्य (८२१३), बागलाण(७१९५), सिन्नर(६७७६), निफाड (९१९५), दिंडोरी(८४८३), नाशिक पूर्व(८५९९), नाशिक मध्य (८९७०), नाशिक पश्चिम (१०२५१), देवळाली(८४७८) तर इगतपुरी (४०३१).


नाशिक मध्य
नांदगाव(६५७३), मालेगाव मध्य (२२३२), मालेगाव बाह्य(६६७४), बागलाण (५१२८), सिन्नर(४५३०), दिंडोरी(४७९१), नाशिक पूर्व (९१४२), नाशिक मध्य(१२२४२), नाशिक पश्चिम (१०७२४), देवळाली(५०८८) आणि इगतपुरी २९४३.


दुबार बोगस नावांमुळेच शहरात भाजपचे ३ आमदार व मनपात ६६ नगरसेवक निवडून आल्याचे या घोटाळ्यामुळे सिद्ध होते. दुबार नावांचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेत शिवसेनेची सत्ता येणार व मनपावर भगवा फडकणार हे आता निश्चित आहे.
- सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

Sakal Podcast: ‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली

SCROLL FOR NEXT