Salim Kutta Case : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत पार्टीमध्ये नाचतानाच्या व्हिडिओसंदर्भात ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.१६) सायंकाळी सुमारे तीन-साडेतीन तास पोलिसांनी कसून चौकशी केली.
मात्र, बडगुजर यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने त्यांना रविवारी (ता.१७) पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, २०१६ मध्ये सलिम कुत्ता पॅरोलवर असताना झालेली पार्टी ही बडगुजर यांच्या आडगाव शिवारातील फार्महाऊसमध्ये झाल्याचे समोर येते आहे. मात्र अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. (sudhakar Badgujar reinterrogated for 3 hours in Salim Kutta Case by police today again interrogation nashik)
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा पार्टीतील नाचतानाचे व्हिडिओ दाखविला आणि सखोल चौकशीची मागणी केली.
त्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
या घटनेमुळे नाशिक पोलिसही सतर्क झाले आणि सुधाकर बडगुजर यांना शुक्रवारीच (ता.१५) सायंकाळी दोन तास चौकशी केली.
त्यानंतर शनिवारी (ता.१६) पुन्हा सायंकाळी ५ वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुमारे साडेतीन तास बडगुजर यांची शहर गुन्हेशाखेच्या युनिट एक येथे गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी चौकशी केली.
यावेळी सलिम कुत्ता याच्याशी झालेली ओळख, पार्टीचे ठिकाण, पार्टीचा आयोजक, पार्टीचे कारण यासह अनेक प्रशनांची सरबत्ती पोलिसांनी केली.
परंतु बडगुजर यांच्याकडून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बडगुजर यांना रविवारी (ता. १७) पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविले आहे.
तपासात सहकार्य : बडगुजर
"पोलिसांकडून काही प्रश्नावलीनुसार प्रश्न विचारले जात आहेत. त्यानुसार, उत्तरे देत पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. याबाबत रविवारी पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यानंतरही बोलावतील त्या-त्यावेळी हजर राहून सहकार्य करणार आहे."
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उबाठा गट)
उत्तरांची टाळाटाळ : पोलीस
"पार्टीसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले परंतु ते सावध भूमिका घेत उत्तर देणे टाळत आहेत. आठवत नाही, आठवून सांगतो, काही वेळ द्या, अशी त्यांची उत्तरे असल्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे त्यांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे."
- विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा युनिट एक.
- पार्टी कोणी, कुठे व कशासाठी आयोजित केली होती?
- सलीम कुत्तासमवेत पार्टीत सहभाग कसा?
- पार्टीनंतर किंवा त्याआधी सलीम व बडगुजर यांच्यात संपर्क होता का?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीत अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याचे उघड होत आहे. बडगुजर व सलीम कुत्ता यांचा व्हिडीओ देखील एका सराईत गुन्हेगारानेच चित्रीत केल्याचे समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या या सराईत गुन्हेगाराचीही पोलिसांनीचौकशी केल्याचे समजते आहे.
कारागृहाकडेही विचारणा
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आरोपी सलिम कुत्ता व बडगुजर यांची ओळख झाल्याचे समोर येत असल्याने त्याअनुषंगाने त्यांची ओळख कशी झाली, बॅरेक जवळ-जवळ होते की कारागृहात आरोपी व न्यायालयीन कोठडीतील संशयित एकमेकांना भेटले कसे? यासह अनेक प्रश्नांसंदर्भात कारागृह प्रशासनाकडे पोलिसांकडून विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.