Meal on banana leaf News esakal
नाशिक

Nashik News : केळीच्या पानावरील सुग्रास भोजन आरोग्यदायी !

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्‍याने त्‍या पानांमधील पोषक तत्त्व अन्नात मिसळतात व ते शरीरासाठी फायदेशीर असतात. मुळातच, भारतीय संस्कृती निसर्गपूजक असून, लग्नकार्यासह अन्य कार्यक्रमांमध्ये भोजनाची केटरर्सना पानावर ‘ऑर्डर’ दिली जाते.

तरुणाईकडून देखील अलीकडच्या काळात केळीच्या पानावरील सुग्रास भोजनाला विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. केरळमध्ये भोजनासह खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी केळीच्या पानांचा वापर केला जात आहे. (Sugras food on banana leaf is healthy Nature worshipping Indian culture Nashik News)

भारतीय संस्‍कृतीमध्ये सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्‍तींना देव मानून त्‍यांची पूजा करण्याची शिकवण मिळते. एवढेच नव्हे, तर भारतीय संस्कृतीत नैसर्गिक साधनांचा उपयोग करताना त्यांचे पुनर्भरण क्षमता अबाधित राखण्याचे मूलतत्त्व समाविष्ट आहे.

त्यामुळे केवळ परंपरा नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्या भारतीय संस्कृतीतील पैलू आताच्या पिढीपुढे ठेवण्याचे काम जुन्या पिढ्यांकडून केले जात आहे. केळीच्या पानाची आरोग्‍य व पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्‍तता आधुनिक युगात टिकून आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा व सहज उपलब्‍धता यामुळे ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा दक्षिण भारतात वर्षानुवर्षे पुढे नेली जात आहे. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत भारतासह इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, मॅक्‍सिको, मध्य अमेरिकामध्ये आढळते.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

निसर्गाला परत करणारी परंपरा

भोजनानंतर केळीचं पान जनावरांना खायला दिले जाते. म्‍हणजेच काय, तर निसर्गाकडून घेऊन उपयोग झाल्‍यावर ते निसर्गाला परत देण्याची परंपरा पाळली जात आहे. नैसर्गिकदृष्ट्या प्लॅस्टिक अथवा थर्माकोलच्या डिश, पेले वापरणे टाळले जाते. मुंबईत दादर व इतर काही रेल्‍वे स्‍थानकांच्या बाहेर दहा रुपयांत चार, अशी केळीची पाने विकत मिळतात. त्यावरून केळीच्या पानांची फारशी किंमत नसल्याचे दिसते.

एवढेच नव्हे, तर आळूवडी, उकडीचे मोदक, मुटकुळे अशा वाफाळलेले पदार्थ हल्ली गृहिणी केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. काही कुटुंबांमधून रोजच्या डब्यातील खाद्यपदार्थ केळीच्या पानात गुंडाळून दिले जातात. दरम्यान, नाशिकमधील केटरर्स पांडुरंग सावजी म्हणाले, की पूर्वीपासून लग्‍नकार्य व अन्य समारंभात भोजनासाठी किती पान असेल याच पद्धतीने ‘ऑर्डर’ स्वीकारली जाते. तसेच मोठ्या कार्यक्रमात केळीचे पानांची पंगत हे दृश्च विलोभनीय व पारंपरिकतेला धरून असल्‍याने यजमानांची पसंती केळीच्या पानाला मिळू लागली आहे.

केळीच्या पानावरील भोजनाचे फायदे

- पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो. जो नैसर्गिक ॲन्टिऑक्‍सिडंट म्‍हणून काम करतो व रोगप्रतिकारक्षमता वाढवतो

- त्वचा तजेल राखण्यास मदत होते

- केळीच्या पानावर भोजन केल्याने डाग-खाज, पुरळ-फोड अशा समस्‍या दूर होतात

भोजनावेळी म्हटला जाणारा श्‍लोक

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।

हरीचिंतने अन्न सेवित जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥

।। जय जय रघुवीर समर्थ ।।|

"केळीच्या पानावर भोजन केल्याने शरीरातील कफ, वात, पित्त यातील दोष धातूंचा समभाव राखला जातो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. अन्नपदार्थ अधिक रूचकर लागतात. शिवाय हिरव्याकंच पानामुळे डोळ्यासह मनाला प्रसन्नता मिळते."

- डॉ. तनुजा बागूल

"तरुणांसाठी केळीच्या पानांचा व्यवसाय फायदेशीर आहे. तसेच यात करिअरची संधी म्‍हणून पाहाण्यास हरकत नाही. केळीचे पाने सहज उपलब्‍ध होण्यातून भोजनाचा आस्‍वाद सोपा आहे."

- अथर्व टेंभेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT