Colleagues, relatives taking the teacher to the hospital for treatment on Saturday. esakal
नाशिक

Nashik News : संस्थाचालक बैठकीप्रसंगी शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील एचएके हायस्कूलमध्ये संस्थाचालकांनी बोलविलेल्या बैठकीत झालेल्या वादातून अमोल निकम या शिक्षकाने शाळेच्या आवारात विषप्राशान करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी (ता. २३) दुपारी केला.

या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शिक्षकास तातडीने उपचारार्थ मालेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिक्षकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अद्यापही पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

मनमाड एज्युकेशन सोसायटीचे एचएके हायस्कूल हे एक नामांकित हायस्कूल आहे. काही विषयासंदर्भात संस्थाचालकांनी शनिवारी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक बोलावली होती.

बैठकीला शिक्षक अमोल निकम हेही उपस्थित होते; परंतु या बैठकीत काही कारणावरून झालेल्या वादातून टोकाचे पाऊल उचलत निकम यांनी शनिवारी दुपारी बैठकीतून उठून शाळेच्या आवारात येऊन विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संस्थेचे आणि शिक्षकाचे बिनसण्याचे नेमके कारण काय, हे मात्र समजू शकले नाही; परंतु पोलिस तपासात पुढे चौकशीतून ते निष्पन्न होऊ शकते.

हा प्रकार घडल्यावर शिक्षकास सहकाऱ्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले; परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: आज मतदान! प्रत्येक क्षणाची अपडेट वाचा एका क्लिकवर

Panchang 20 November: आजच्या दिवशी विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा

केंद्रांवरील हालचालींवर पोलिसांच्या ड्रोन अन्‌ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष! सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 11000 पोलिसांचा बंदोबस्त, चहा-नाष्टा, जेवण जागेवरच

आजचे राशिभविष्य - 20 नोव्हेंबर 2024

घरबसल्या शोधा मतदार यादीत तुमचे नाव! नाव शोधण्यासाठी ‘हे’ ३ पर्याय; आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ; मतदान कार्ड नसेल तरी करता येईल मतदान, वाचा...

SCROLL FOR NEXT