Raisins esakal
नाशिक

Nashik Raisins News: सल्फरच्या बेदाण्याला 150 रुपये प्रतिकिलो दर

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : द्राक्ष हंगामाचे वेध लागलेले असताना, उपउत्पादन असलेल्या सल्फरच्या बेदाण्याला १५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. जुन्या बेदाण्याचा साठा अंतिम टप्प्यात आला आहे. दर्जा सर्वात्तम असलेल्या बेदाणा भाव खात आहे. परदेशात अद्याप मागणी टिकून आहे. (Sulfur raisin price Rs 150 per kg at pimplegaon nashik)

पिंपळगाव बाजार समितीत लिलावासाठी सोमवारी (ता. ५) तीनशे टन बेदाण्याची आवक झाली. मागील हंगामात नाशिक जिल्ह्यात बेदाण्याची १८ हजार टन उत्पादन झाले होते. अजून दीड हजार टन बेदाणा उत्पादकांकडे आहे.

मागील हंगामात उत्पादित झालेल्या बेदाण्याला सध्या रशिया, युरोप, सौदी अरेबिया येथून मागणी आहे. मागणी पुरविण्यासाठी व्यापाऱ्यांची सोमवारी बेदाणा खरेदीसाठी चढाओढ लागलेली दिसली. किमान १००, कमाल १५५ तर सरासरी १३० रुपये प्रतिकिलो दर बेदाण्याला मिळाला.

पिंपळगाव बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांनी बेदाणा लिलावाला सोमवारी भेट दिली.

बेदाणा व्यापारी शितलकुमार भंडारी, स्नेहल शाह, शांतिलाल चोरडीया, मोतीलाल चोरडीया, रघुनाथ शिनकर, राजेंद्र कुंभार, प्रवीण कुलथे, महेंद्र ओसवाल, योगेश ठक्कर, प्रमोद राठी, करसदास ठक्कर, रवींद्र घुमरे, इक्बाल कुरेशी, सुनील दीक्षित, आतीश कोचर, आकाश कोचर यांनी लिलावात भाग घेतला.

"मागील हंगामातील बेदाणा अंतिम टप्प्यात आहे. नव्या बेदाण्याचे आगमन जानेवारीत होईल. परदेशात मागणी टिकून असल्याने भाव स्थिर आहे."-शितलकुमार भंडारी, बेदाणा व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT