Onion Rates Hike esakal
नाशिक

Onion Rates Hike: विजयादशमीच्या पूर्वसंध्येला उन्हाळी कांदा भावाचे सीमोल्लंघन! क्विंटलला 551 ते 750 रुपयांची वृद्धी

महेंद्र महाजन

Onion Rates Hike : इंदूरच्या बाजारात रविवारी (ता. २२) कांद्याला ४० ते ४२ रुपये भाव मिळाल्यावर उन्हाळी कांद्याच्या भावाचे चित्र स्पष्ट झाले होते. विजयादशमीच्या (ता. २४) पूर्वसंध्येला कांद्याचे आगार नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या भावाने सीमोल्लंघन केले.

शनिवारच्या (ता. २१) तुलनेत सोमवारी (ता. २३) क्विंटलच्या सरासरी भावात ५५१ ते ७५० रुपयांची वाढ होऊन भाव क्विंटलला तीन हजार ६८० ते तीन हजार ९०० रुपयांपर्यंत पोचले. (summer onion prices hike on eve of Vijayadashami 551 to 750 rupees per quintal nashik)

देशासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी आवश्‍यक असलेली गरज खरिपामध्ये पूर्ण केली जाते. मात्र यंदा आवश्‍यकतेच्या तुलनेत निम्म्याहून अधिक क्षेत्रावर देशात कांद्याची लागवड झाली असली, तरीही त्यातील २० टक्के कांदा खराब झाला आहे.

दक्षिण भारतात या तीन महिन्यांसाठी लागणाऱ्या कांद्याचे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत असायचे. आता हे क्षेत्र निम्म्याहून अधिकपर्यंत पोचले. त्यातील एका टप्प्यातील कांदा बाजारात दाखल झाला आहे.

दक्षिण भारतात अशी स्थिती का तयार झाली? याची माहिती कृषी अभ्यासकांकडून मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार मागील चार वर्षे निसर्गाची, बाजारभाव आणि सरकारची साथ मिळाली नाही.

त्यातून दक्षिण भारतातील खरिपाच्या कांद्याचे उत्पादन घटले आहे. नवीन लाल कांद्याच्या लागवडीची ही स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे मात्र ‘पॅनिक बाइंग’ची कायम आहे.

गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर या महिन्यात गेल्या आठवड्यापर्यंत भाव कमी होईल म्हणून वाट पाहत बसलेल्या बियाणे उत्पादकांनी कांद्याच्या खरेदीचा श्रीगणेशा सुरू केला. साठवणूकदारांपैकी बरेचजण आता खरेदीदार बनले आहेत.

हे कमी काय म्हणून श्रीलंका, दुबई, बांगलादेशच्या आयातदारांनी कांद्याच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले आहे. टनाला ६४० डॉलरवरून श्रीलंकेचा भाव ८०० डॉलरवर पोटला. दुबईसाठी ७६० ते ७७० डॉलरने कांद्याची विक्री सुरू आहे.

बांगलादेशसाठी ७५० ते ७६० डॉलरने कांदा आयातदार घेताहेत. या साऱ्या परिस्थितीत कांद्याची अभूतपूर्व टंचाईची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत.

कांदा देता का कांदा...

देशांतर्गत मागणी आणि उपलब्धता हे गणित जुळत नसल्याने खरेदीदारांवर ‘कांदा देता का कांदा’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे खरेदीदारांना एकेक दिवस वर्षासारखा वाटू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याचअनुषंगाने कांद्याचा ‘यह तो ट्रेलर है, दिवाली में पिक्चर शुरू हो जाएगा’, असे व्यापाऱ्यांनी सांगण्यास सुरवात केली आहे. मुळातच, हवामान प्रतिकूल होत चालले आहे. त्यादृष्टीने पारंपरिक पद्धतीने आपण खरिपाचा विचार करत चाललो आहे, हे निसर्ग चुकीचे ठरवत आहे.

त्यामुळे आता सरकारने खरिपातील उत्पादन वाढीच्या जोडीला वर्षभर कायम कांदा उपलब्ध होईल यादृष्टीने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्‍यकता कृषी अभ्यासक अधोरेखित करत आहेत.

‘प्याज ना घाटो, प्याज ही भरो !’

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असताना ‘प्याज ना घाटो, प्याज ही भरो !’ ही राजस्थानमधील शेतकऱ्यांची अपेक्षा यंदा रास्त ठरण्याच्या दिशेने निघाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून राजस्थानमधील शेतकऱ्यांना कांद्याने अडचणीत आणले. आता अलवर भागात १० नोव्हेंबरपासून बाजारात येणाऱ्या कांद्याचे तीन लाख टनापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. देशाची गरज पाहता, हा कांदा पाच दिवस पुरेल एवढा उत्पादित होईल. परिणामी, कांद्याचे नुकसान कांदा भरून देतो, याची प्रचीती राजस्थानमधील शेतकरी देशवासीयांना देतील.

कांद्याच्या भावाची स्थिती (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठ सोमवारी (ता. २३) शनिवारी (ता. २१)

कोल्हापूर दोन हजार ६०० दोन हजार ८००

मुंबई दोन हजार ७५० दोन हजार ६५०

सातारा दोन हजार ७०० दोन हजार ९००

पुणे दोन हजार ७०० दोन हजार ६००

येवला तीन हजार ७५० तीन हजार १५०

लासलगाव तीन हजार ९५० तीन हजार २००

विंचूर तीन हजार ८५० तीन हजार २५०

कळवण तीन हजार ८५१ तीन हजार ३००

चांदवड तीन हजार ६८० तीन हजार १००

मनमाड तीन हजार ७०० तीन हजार

पिंपळगाव तीन हजार ९०० तीन हजार २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT