Summer Season esakal
नाशिक

Summer Season : उन्हाचा कडाक्यासोबत श्‍वसनाच्या त्रासाने मृत्यूचे प्रमाणही वाढले

मंगळवारी दिवसभरात चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Summer Season : शहर-जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यासोबतच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या श्‍वसनाच्या विकारांत वाढ होऊन त्यात मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

अशा पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २५) वेगवेगळ्या घटनांत चार रुग्णांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. ( Summer Season With harshness of summer death rate due to respiratory problems also increased nashik)

वाढत्या उन्हासोबत रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याच्या घटना वाढत असून, उपचारादरम्यान रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. रोशन जगदीश गांगुर्डे (वय ३०, रा. सिद्धार्थ चौक, स्वारबाबानगर, सातपूर) यांना मंगळवारी सकाळी नऊला घरी असताना छातीत दुखून श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला.

त्यामुळे पत्नी दिव्या गांगुर्डे यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना अकराच्या सुमारास डॉ. उदर मिर्झा यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दुसऱ्या घटनेत लॅम रोड येथील मिलींद बाबूराव सायखेडे (वय ५२, रा. सौभाग्यनगर) यांनाही तसाच त्रास होऊ लागल्याने पत्नी किरण सायखेडे यांनी त्यांना लॅम रोड भागातील संतकृपा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डॉ. मनीष बोथरा यांनी त्यांना मृत घोषीत केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत नोंद झाली आहे. असाच आणखी एक प्रकार नाशिक रोडला उघडकीस आला. त्यात, देवी चौकात व्यापारी बँकेसमोरुन जात असताना एक जण अचानक बेशुद्ध झाला. स्थानिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला माहीती दिल्यानंतर त्यास बेशुद्धावस्थेतच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे दुपारी दीडच्या सुमारास डॉ. धूम यांनी त्यास मृत घोषीत केले. संबंधिताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तर, चौथ्या घटनेत उदयभान सुर्यभान लगड (वय ७०, साई पॅराडाईज, दुर्गानगर, अमृतधाम) या ज्येष्ठ नागरिकास मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास राहत्या घरी उलटी होऊन श्‍वास घेण्यास त्रास होउ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. अभिषेक डे यांनी घोषीत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT