किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
Wild Vegetable : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप सर्वत्र साजरा होत असताना अजूनही सुरगाणा तालुक्यातील आवळपाडा गावात बस पोचलेली नाही.
येथील सुनील महाले या युवकाने रानभाज्यांपासून आरोग्यदायी चहा बनवला आहे. सर्दी, खोकला, ॲसिडिटी, हिवताप, डोकेदुखीवर हा चहा अत्यंत गुणकारी असल्याचा दावा त्याने केला आहे. (Sunil Mahale make healthy tea from wild vegetables nashik news)
चहा म्हटले, की प्रत्येकाला ततो हवाहवासा वाटतो. त्यात आता साखरेऐवजी गुळाचा चहा, अमृततुल्य, बिगर दुधाचा चहा, आरोग्य चहा असे अनेक प्रकार उदयास आले आहेत. गल्लीबोळात चहाची दुकाने दिसतात. आता रानभाज्यांपासून बनवलेला आरोग्यदायी चहा हा तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकला असेल.
सुरगाण्यापासून २५ किलोमीटरवरील आवळपाडा येथील सुनील महाले या युवकाने हा चहा तयार केला आहे. चुलीवर उकळवला जाणाऱ्या चहात तुळस, गूळ, वेलची, पाणी, अद्रक, चहा पावडर, लवंग, लिंबू, गवतीचहाचा वापर केला आहे. या मिश्रणापासून तयार झालेला चहा दिवसातून दोन वेळा पिल्यास लहान मुलांना सतवणारी सर्दी, खोकला, घसादुखी, हिवतापापासून कायमची मुक्ती मिळते, असा दावा सुनीलने केला आहे.
याशिवाय ॲसिडिटी, डोकेदुखीवरही हा चहा ‘रामबाण’ उपाय असल्याचे तो सांगतो. सुरगाण्यात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुनीलचे आवळपाडा गावाने अजूनही बस पाहिलेली नाही. १२५ उंबराच्या या गावची सुमारे सहाशे लोकसंख्या आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गुजरात सीमेलगत असलेल्या गावांमध्ये अद्याप बस पोचली; पण आमच्या फणसपाडा, बेंडवळ, आवळपाडा या गावांना अजूनही बसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी घरगुती उपायांवर अवलंबून राहावे लागते. घरातील लहान मुलगी आजारी पडल्यास बनवलेल्या या आरोग्यदायी चहाचा प्रवास त्यांना नाशिकपर्यंत घेऊन आला आहे.
....यापासून बनवला आयुर्वेदिक चहा
आयुर्वेदिक चहा बनवण्यासाठी सुनीलने तुळस, गूळ, वेलची, पाणी, अद्रक, चहा पावडर, लवंग, लिंबू, गवती चहाचा योग्य प्रमाणात वापर केला आहे. त्यापासून चहा पावडर तयार केली असून, २० रुपयांना ही पावडर मिळते. चहा बनवण्यासाठी त्याने अडीच हजारांची शेगडी, गूळ, इतर साहित्य असे एकूण हजार रुपये खर्च केला आहे.
"घरातील मुलगी आजारी पडली तेव्हा तिला हा चहा पिण्यासाठी दिला. यानंतर ती एकदम बरी झाली. तुळस, गूळ, वेलची यांसारख्या नऊ गोष्टींचे योग्यप्रकारे मिश्रण केल्यास बहुतांश आजार दूर होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यानंतर हा चहा विकण्यास मी सुरवात केली आहे." -सुनील महाले, उत्पादक, आयुर्वेदिक चहा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.