Sunil Pawar & his Business esakal
नाशिक

Nashik : चित्रकलाच बनली नवनिर्मितीचे साधन

योगेश सोनवणे

पिंपळगाव (वा.) (जि. नाशिक) : कला क्षेत्रातील (Art Field) शिक्षण घेऊनही नोकरीसाठी भटकंती करावी लागली. कधी रोजंदारी शिक्षक (Teacher), कधी एखाद्या कपड्यांच्या दुकानात सेल्समन (Salesman), तर कधी एखाद्या हॉटेल वेटर (Waiter) अशा अनेक ठिकाणी काम केले. या कामांचा योग्य परतावा न मिळाल्याने सर्व ठिकाणी काम करूनही अस्वस्थता कायम राहिली. परंतु, स्वतः कडील असलेल्या कला- गुणांना वाव देत भोवताली असलेल्या लोकांचा कल लक्षात घेऊन व उत्पादनांची गरज ओळखून छंदांमधून व्यवसायांची निर्मिती केली जाऊ शकते. ‘कालाय तस्मै नमः’ या उक्तीप्रमाणे व्यवसायाची क्षेत्रेसुद्धा बदलत आहेत. लोकांना अपेक्षित असलेल्या अगदी बारीक- सारीक गरजा ओळखून त्यात नाविन्याची भर घालत नव्या व्यवसायाची पायाभरणी केली जाऊ शकते अन् हे सिद्ध केलेय सुनील पवार यांनी. (Sunil Pawar work of mandap decorators from self made decorative materials Nashik News)

मोहबारी (ता. कळवण) येथील सुनील पवार यांनी ए. टी. डी. चे शिक्षण सटाणा येथील रचना महाविद्यालयात केले. त्यानंतर लोहोणेर येथील दौलतराव आहेर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून बी.एड. पूर्ण केले. शिक्षण संपल्यानंतर सुनील पवार यांनी पेंटिंग कलरिंग, थर्माकॉलची कामे केली. श्री. पवार हे ततानी (ता. सटाणा) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षक पदावर रुजू झाले. रोजंदारी शिक्षक असल्यामुळे आश्रमशाळेकडून कामाचा योग्य परतावा मिळत नसल्यामुळे त्यांनी डांगसौंदाणे येथे रुम घेऊन खासगी क्लासेस सुरू केले. श्री. पवार त्यावेळी अविवाहित असल्यामुळे स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करीत असे. स्वयंपाक करीत असताना स्टोच्या भडक्यामुळे सुनील पवार ७२ टक्के भाजले. त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचारासाठी लागणारा खर्च न परवडणारा होता.

पवार यांच्या वडिलांनी त्यांना तशाच परिस्थितीत घरी आणले. पवार ७२ टक्के भाजलेले असताना तब्बल दोन वर्षे अंथरूणावर पडून होते. त्यानंतर त्यांनी नाशिक गाठले अन् नाशिकमध्ये कुमार शर्टमध्ये सेल्समनचे काम केले. काठियावाड या कपड्यांच्या दुकानात काम केले. नाशिकमध्ये सूर्या हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. हॉटेलमध्ये काम करीत असताना विविध प्रकारच्या सेलिब्रेशन पार्टीचे डेकोरेशनचे काम केले. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठात रोजंदारी स्वरूपात लिपिकाची नोकरी केली. हे काम करीत असताना त्यांच्यातील चित्रकला त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची नोकरी सोडली अन् पेंटिंग डिझाईनचे काम सुरू केले. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत त्यांना कला शिक्षक म्हणून नेमण्यात आले. अन् कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाउन झाले.

त्यामुळे पवार गावी परततले अन् गावी येऊन बँकेचे कर्ज काढून सुरवातीला गोडाऊन उभारले. अन् त्यात थर्माकॉल व फोमशीट डिझाईनचे काम सुरू केले. दिवाळीत आकाशकंदील, गणेशोत्सवाच्या पूर्वी थर्माकॉलचे मखर असे विविध सजावटीचे साहित्य ते तयार करतात. त्यांनी व्यवसायात वाढ करत लग्नसराईत मंडप डेकोरेटर्सचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे सुनील पवार यांनी स्वतः बनवलेले डेकोरेशनचे साहित्य ते आपल्या मंडप व्यवसायात वापरतात. कलेच्या जोरावर त्यांनी एक वेगळा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या आकर्षक डिझाईन्समुळे कसमादे परिसरात सध्या त्यांच्या मंडप डेकोरेशनची चलती आहे. त्यांच्या या व्यवसायामुळे गावातील २५ ते ३० तरुणांना रोजगार मिळवून दिला. तसेच, आदिवासी भागात कमी खर्चात मंडप डेकोरेशन उपलब्ध करून दिले.

"सूर्या हॉटेलमध्ये काम करताना तिथे वेगवेगळ्या बर्थ डे पार्ट्या होत असे. पार्ट्यांमध्ये आकर्षक स्टेज डेकोरेशन केलेले असायचे. मी कला क्षेत्रात काम केलेले होते. त्यामुळे मलाही त्यात इंटरेस्ट वाटला. मी पुणे येथे इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला अन् डेकोरेशनच्या नव्या दुनियेत आलो. या व्यवसायात मला चांगला प्रतिसाद मिळतोय." - सुनील पवार, मंडप डेकोरेटर्स, मोहबारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT