sunil sawant esakal
नाशिक

डोंगरगावच्या तरुणाच्या हाती गुजरातमधील व्हीव्हीआयपी सुरक्षा!

मोठाभाऊ पगार

देवळा (जि.नाशिक) : संकटे झेलत आणि संघर्ष करत डोंगरगाव (देवळा) येथील सुनील सावंत यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशोगाथेची व कोरोनाकाळात केलेल्या सेवाभावी उपक्रमाची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाइस प्रेसिडेंट दिव्यांग आंधी यांनी त्यांना नुकतेच सन्मानित केले. सावंत यांची आव्हानात्मक वाटचाल निश्चितच आजच्या युवावर्गाला प्रेरणादायी आहे. (Sunil-Sawant-honored-by-World-Book-of-Records-nashik-marathi-news)

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडून गौरव

सुनील सुरेश सावंत यांची वाटचाल आव्हानात्मक आहे. २००८ मध्ये भारतीय सेनेत भरती होऊन बेळगाव (कर्नाटक) या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केले. प्रशिक्षणोत्तर उपक्रमात त्यांचा पाय मोडला. सैनिकी दवाखान्यात उपचार केले, परंतु दुखापत जास्त असल्याने नाइलाजास्तव वैद्यकीय कारणामुळे त्यांना घरी यावे लागले. पायाची जखम भरून शारीरिकदृष्ट्या फिट झाल्याने त्यांनी नवीन नोकरीचा शोध सुरू केला. त्यात सैनिकसेवेचा संदर्भ असल्याने त्यांना गुजरातमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याचे काम मिळाले. प्रामाणिक, आदर्शवत व शिस्तबद्ध काम केल्याने त्यांच्या कामाचा आवाका वाढत गेला. आता गुजरातमधील व्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याचे काम सुनील पेलत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून या महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीविताची जबाबदारी सुनीलवर असते. मंत्री, क्रिकेटपटू, कलाकार, सेलिब्रिटी, उद्योजक, व्यावसायिक अशा अनेकांना त्यांनी आतापर्यंत अंगरक्षक म्हणून सुरक्षित सेवा पुरविली आहे.

तरुणांना दिली रोजगाराची संधी

भारतीय सेनेतील सैनिकाचा अनुभव असल्याने कोणत्याही आव्हानाचा सामना करायला ते तयार असतात. कामाची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडून अंगरक्षकासाठी मागणी वाढल्याने त्यांनी स्वतःची सिक्युरिटी एजन्सी संस्था उभी केली. त्यात आपल्यासारख्याच तरुणांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. तरुणांना योग्य मार्गदर्शन, कामाची पद्धत, सूक्ष्म निरीक्षण, बिकट परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षितता याबाबत तयार करत त्यांची योग्य ठिकाणी ते सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करतात. गुजरातमध्ये त्यांची ‘ए वन लायन सिक्युरिटी सर्व्हिसेस’ संस्था सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात सक्रिय आहे. मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नाहीत, यावर ठाम विश्वास असल्याने सावंत यांनी आपली वाटचाल यशस्वी केली. त्यांच्या या वाटचालीत पत्नी माधवी यांचे मोठे योगदान आहे. आपल्या गावासाठी मोठे काम करण्याचा त्यांचा मानस आहे. सुरक्षा व्यवस्थेतील काम व कोरोनाकाळात केलेले सेवाभावी कार्य याची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाइस प्रेसिडेंट दिव्यांग आंधी यांनी त्यांना सन्मानित केले. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला.

डेटॉलकडून गौरव

गुजरातमध्ये कोरोनाकाळात त्यांनी अनेक गरजू व गरीब लोकांना धान्य, कपडे तसेच आदींची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली. संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले, तरीही जनतेच्या सेवेत खंड पडू दिला नाही. डेटॉल इंडिया या कंपनीने या कामाची दखल घेत त्यांच्या उत्पादनावर या सावंत पती व पत्नी यांचे फोटो प्रसिद्ध करत त्यांना गौरविले.

आजकालच्या प्रत्येक युवकाने मन, मेंदू आणि मनगट बळकट बनविणे यावर भर द्यायला हवा. केवळ नोकरीवर विसंबून न राहता व्यवसाय हा पर्याय सतत डोळ्यासमोर असू द्यावा.

-सुनील सावंत, डोंगरगाव

सुनीलने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःला सिद्ध केले आहे. देशाचे संरक्षण करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले, तरी देशांतर्गत सुरक्षा निभावण्याचे कार्य तो पार पाडत आहे. त्याची जीवनाची वाटचाल युवकांना प्रेरक आहे.

- एस. के. सावंत, मुख्याध्यापक, कृष्णाजी माउली माध्यमिक विद्यालय, डोंगरगाव

गुजरातमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षाव्यवस्थेचे आव्हानात्मक काम आमचा मित्र सुनील करतो, हे आमच्या गावासाठी अभिमानास्पद आहे.

-दयाराम सावंत, सरपंच, डोंगरगाव

प्रत्येक विद्यार्थ्याने असेच वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत उत्तुंग यश मिळवावे.

-एकनाथ सावळा, माध्यमिक शिक्षक, डोंगरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT