Mrs. Dhangar's stay in police custody has been extended by another day. esakal
नाशिक

Sunita Dhangar Bribe Case: लाचखोर धनगर यांच्या बँकखात्यात 30 लाख! सिव्हिलमध्ये दाखल होण्याचा डाव फसला

सकाळ वृत्तसेवा

Sunita Dhangar Bribe Case : बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या बँकेच्या खात्यात ३० लाख १६ हजार ६२० रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. सदरील बँक खाते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केले आहे.

तसेच, श्रीमती धनगर यांच्या पोलिस कोठडीतील मुक्काम आणखी एका दिवसाने वाढला आहे. दरम्यान, प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत, त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासण्याअंती त्यांना दाखल न केल्याचा त्यांचा ‘डाव’ फसला. (Sunita Dhangar Bribe Case 30 lakhs in bank account nashik news)

नाशिकरोड परिसरातील एका शाळेच्या बडतर्फ मुख्याध्यापकाच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २) महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजार रुपयांची तर, कनिष्ठ लिपिक नितीन जोशी यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

लाचखोर धनगर यांच्या घरझडतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या हाती ८५ लाख रुपयांची रोकड, ३२ तोळे सोने आणि दोन फ्लॅटसह प्लॉटची कागदपत्रे असा सुमारे पाच ते साडेपाच कोटींची मालमत्ता सापडली होती.

दरम्यान, श्रीमती धनगर यांच्या बँक खात्यांसंदर्भातील माहिती पथकाने संकलित केली होती परंतु दोन दिवस सुट्ट्यांनंतर आज पथकाने बँकांमध्ये पोहोचून त्यांच्या खात्यांवरील रक्कमेचा शोध घेतला.

यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चार बँक खाते आणि जिल्हा बँक अशा पाच खात्यांवर एकूण ३० लाख १६ हजार ६२० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्रीमती धनगर यांच्याकडून पथकाच्या हाती रोख स्वरुपातील १ कोटी १५ लाख १६ हजार ६२० रुपयांची रोकडच लागली आहे.

श्रीमती धनगर यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. मंगळवारी (ता. ६) श्रीमती धनगर यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लाचखोर धनगर यांची ‘माया’

* घरझडतीत सापडलेली रोकड : ८५ लाख रुपये

* बँक खात्यातील रक्कम : ३० लाख १६ हजार ६२० रुपये

* सोने : ३२ तोळे

* आडगाव शिवारात प्लॉट

* उंटवाडीतील राहता फ्लॅट व टिळकवाडीतील एक आलिशान फ्लॅट : सुमारे अडीच कोटी रुपये

‘ॲडमिट’चा ‘डाव’ फसला

गेल्या शुक्रवारपासून (ता. २) पोलिस कोठडी असलेल्या लाचखोर श्रीमती सुनीता धनगर यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

त्यावेळी त्यांनी प्रकृती अस्वस्थतेची तक्रार करीत सिव्हिलमध्ये ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्रीमती धनगर यांना ॲडमिट करून घेतले नाही. त्यामुळे श्रीमती धनगर यांचा ॲडमिटचा डाव फसल्याने त्यांना ‘लाचलुचपत’च्या पथकाने पोलिस कोठडीत घेऊन गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT