Education officer Sunita Dhangar was being brought to the office of the Anti-Corruption Bureau in a bribery case esakal
नाशिक

Sunita Dhangar Bribe Case: लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर मालामाल; घरझडतीत हाती लागलं मोठं घबाड

नरेश हाळणोर

Sunita Dhangar Bribe Case : नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आल्यानंतर, शनिवारी (ता. ३) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

या वेळी न्यायालयाने श्रीमती धनगर यांना सोमवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्रीमती धनगर यांच्या घराची झडती घेतली असता, मोठी ‘माया’ पथकाच्या हाती लागली.

यात ८५ लाखांची रोकड, ३२ तोळे सोने आणि कोट्यवधी रुपयांचे दोन आलिशान फ्लॅट्स व प्लॉटच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

या मालमत्तेवरून महापालिकेच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून, याच माध्यमातून श्रीमती धनगर यांनी कोट्यवधींची माया जमविल्याचे समोर आले आहे. (sunita dhangar bribe case house raid nashik crime news)


महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता सुभाष धनगर (५७, रा. रचित सनशाइन, उंटवाडी, नाशिक), कार्यालयातील लिपिक नितीन अनिल जोशी (४५, रा. पुष्पांकुर, चव्हाणनगर, तपोवन, नाशिक) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २) दुपारी मनपा मुख्यालयातील त्यांच्या दालनातून लाच स्वीकारताना अटक केली होती. धनगर यांनी ५० हजार, तर लिपिक जोशी याने पाच हजारांची लाच स्वीकारली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर श्रीमती धनगर यांच्या उंटवाडी येथील आलिशान फ्लॅटमध्ये झडतीसत्र राबविण्यात आले. या झडतीसत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती घरातूनच ८५ लाखांची रोकड, ३२ तोळे सोने लागले.

हे पाहूनच पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला, तर उंटवाडीतील आलिशान फ्लॅटसह शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या टिळकवाडीतही दुसरा फ्लॅटची कागदपत्रे पथकाच्या हाती लागली.

या दोन्ही फ्लॅटचे बाजारमूल्य दोन ते अडीच कोटींचे आहे. याशिवाय आडगाव शिवारातील प्लॉटची कागदपत्रेही पथकाच्या हाती लागली आहेत. उंटवाडीतील फ्लॅट लाचलुचपतच्या पथकाने सीलबंद केला आहे.

तसेच, श्रीमती धनगर यांच्या बँक खात्यांचीही माहिती संकलित करण्यात येत आहे. यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत १२ लाख ७५ हजारांची रक्कम असल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्यांच्या बँक लॉकर्सचीही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक करीत आहेत. लाचखोर दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदरील कारवाई ‘लाचलुचपत’च्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार, वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव व पथक तपास करीत आहे.


हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे आहे प्रकरण

बडतर्फ मुख्याध्यापकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, नाशिक रोड परिसरातील एका शैक्षणिक संस्थेने तक्रारदार मुख्याध्यापकास बडतर्फ केले होते. त्याविरोधात त्यांनी शैक्षणिक न्यायाधीकरणकडे दाद मागितली असता, त्यांच्या बडतर्फीला स्थगिती मिळाली होती.

मात्र त्यानंतरही संस्था त्यांना सेवेत घेत नसल्याने त्यासंदर्भातील सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर यांच्याकडे अर्ज केला होता. सदरील संस्थेला पत्र देण्यासाठी श्रीमती धनगर यांनी ५० हजार रुपये, तर लिपिक नितीन जोशी याने पत्र तयार करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

त्यानुसार तक्रारदाराच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (ता. १) दुपारी मनपा शिक्षणाधिकारी कार्यालयात श्रीमती धनगर, नितीन जोशी या दोघांना लाच स्वीकारताना अटक केली.

श्रीमती धनगर यांनी जमविलेली ‘माया’

* घरझडतीमध्ये सापडली ८५ लाखांची रोकड
* ३२ तोळे सोने
* प्रत्येकी सव्वा ते दीड कोटींचे दोन आलिशान फ्लॅट
* उंटवाडीतील रचिन सनशाइनमधील फ्लॅट नं. ८
* टिळकवाडीतील आदिनाथ निवासमधील फ्लॅट नं. ११
* मौजे आडगाव शिवारातील प्लॉटची कागदपत्रे
* राष्ट्रीयीकृत बँकेत १२ लाख ७५ हजार रुपये
* मालमत्ता व लॉकर्सचा शोध सुरू
* आत्तापर्यंत सुमारे पाच-साडेपाच कोटींची मालमत्ता

‘ती’ मी नव्हेच...

पथकाने लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्यानंतरही श्रीमती धनगर यांनी त्यांच्या सुपरिचित स्वभावानुसार आकांडतांडव करण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने त्यांना शांतपणे ताब्यात घेत ‘लाचलुचपत’च्या कार्यालयात आणले.

तरीही लाचखोर धनगर यांची अरेरावी सुरूच होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पुराव्यासह करण्यात आलेल्या कारवाईचा ‘नमुना’ दाखविल्यानंतर मात्र ‘ती’ मी नव्हेच..’चा तोरा कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

"लाच घेणे आणि देणे दोन्हीही गुन्हा आहे. त्यामुळे तक्रारदारांनी न घाबरता तक्रारी देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी १०६४ यावर संपर्क साधावा."

- श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.

पंधरा दिवसापूर्वीच ट्रॅप

महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर व कनिष्ठ लिपिक नितीन जोशी यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहे.

महापालिका तसेच खासगी शाळांमधील जवळपास १४२ शिक्षकांच्या बदल्यांसाठी प्रत्येकी ४० हजार रुपयांची मागणी देखील करण्यात आल्याची बाब आता चर्चेला आल्याने धनगर व कनिष्ठ लिपिक जोशी यांचा पाय अधिक खोलात रुतत आहे. शाळांवरील कारवाई थांबविणे महापालिकेच्या शिक्षकांच्या बदल्या उपशिक्षकांना पदोन्नती यासारख्या प्रकरणात देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणी केली जात होती.

त्यासाठी शिक्षण विभागात मोठी साखळी अद्यापही कार्यरत असल्याची चर्चा आहे. दरम्यान शिक्षकांच्या बदली प्रकरणात मेटाकुटीला आलेल्या काही शिक्षकांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना हाताशी धरून पंधरा दिवसापूर्वीच शिक्षणाधिकारी धनगर व त्यांची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रॅप करण्यासाठी फिल्डिंग लावली होती, त्यापूर्वीच धनगर व जोशी दुसऱ्या प्रकरणात अडकल्याने दोघांनाही शिक्षा व्हावी, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे.

कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे ही प्रस्ताव

लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विविध सेवांमध्ये वर्ग करण्यात आले आहे त्यातीलच काही कर्मचारी शिक्षण विभागात वर्ग करण्यात आले मात्र शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याने या कर्मचाऱ्यांनी बदल्यांसाठी प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविला. मात्र प्रशासन विभागातच अडचणीच्या मोठा डोंगर असल्याची बाब लक्षात आल्यानंतर प्रशासन उपायुक्त बदलून गेल्यानंतर बदलीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT