Nashik MD Drug Case : शिंदेगावात उदध्वस्त करण्यात आलेल्या कारखान्यांना एमडी ड्रग्ज (मॅफेड्रॉन) बनविण्यासाठी लागणारे रसायन भिंवडी आणि नवी मुंबईतून पुरवठा होत असल्याचे तपासातून समोर आले आहे. (Supply of chemicals from Bhiwandi Navi Mumbai to Shinde village factory nashik news)
याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. त्याचप्रमाणे, शिंदेगावच्या कारखान्यात तयार होणारा एमडी पुणे, ठाणे, मुंबईत पाठविले जात असल्याचेही संशयिताने तपासात सांगितले आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी साकीनाका पोलिसांपाठोपाठ नाशिक पोलिसांनी शिंदेगावात धाडी टाकत एमडी ड्रग्जचे दोन कारखाने उदध्वस्त केले हाेते. या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा साठा व साहित्य जप्त केले होते. यातूनच, ललित पाटील (पानपाटील) याचा भाऊ भूषण पाटीलचा सहभाग निश्चित झाला होता.
साकीनाका पोलिसांनी याच प्रकरणी शिवा अंबादास शिंदे यास नाशिकमधून अटक केली होती. सध्या तो आर्थररोड कारागृहात असताना, नाशिक पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. याच चौकशीतून त्याने सदरील दोन्ही कारखाने हे संशयित भूषण पाटील याच्या सांगण्यावरुन व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
६ ऑक्टोबर रोजी नाशिकरोड व शहर गुन्हे पोलिसांनी शिंदेगावात एका गोदामात धाड टाकून ५ कोटी ९४ लाखांचा एमडीचा साठा व रसायनाचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला होता. त्यावेळी साकीनाका पोलिसांनी शिवा शिंदे यास अटक केली होती. त्यानंतर त्याचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला हाेता. दोघांच्या चौकशीनंतर त्यास नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. याच चौकशीतून या बाबी समाेर आल्या आहेत.
अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक हेमंत नागरे हे पुढील तपास करीत आहेत. नाशिक पोलिसांना भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांच्यासह ललित पाटील याचाही ताबा घ्यायचा आहे. त्यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.