Nashik News : महसूल, भूमी, अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे कळवण तालुक्यातील १०८ गावांचे गावठाणांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असून ड्रोनद्वारे मोजणी झाल्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील नकाशे उपलब्ध झाले आहेत.
जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र (सनद) उपलब्ध होणार आहे.
यावेळी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे दळवट, भांडणे (हातगड) व मेहदर येथील नागरिकांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. (Survey of 108 villages in Kalwan taluka Villagers will get property charters Maps available Nashik News)
जिल्ह्यासह तालुक्यातील बहुतांश गावठाणचे अभिलेख नसल्याने जमिनींचे व्यवहार करताना अनेकदा अडचणी येतात. परंतु आता ड्रोनच्या माध्यमातून मालमत्तेवरून होणारे वाद मिटणार आहेत.
२९ सप्टेंबर २०२१ रोजी कळवण तालुक्यातील सप्तशृंगीगड या तीर्थक्षेत्रातील गावठाणचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यास सुरवात झाली. ड्रोनच्या मदतीने १०८ गावातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
सर्वेक्षणामुळे ग्रामपंचायतींचे नकाशे, सरकारी जमिनी आणि सरकारी जमिनीवर झालेली अतिक्रमणे याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे.
पारंपरिक पद्धतीने जमिनीची मोजणी करताना विलंब लागत होता. ड्रोनचा वापर करण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यात करार झाला असल्याने हे काम वेगाने आणि अचूकपणे केले गेले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कळवण तालुक्यातील १०८ गावातील मिळकत धारकांची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे. मिळकतधारकांनी हक्काची सनद प्राप्त करून घ्यावी भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात येणारी सनद ही मिळकतीचा नागरिकांना दिलेला हक्काचा पुरावा असणार असून सनदमुळे खरेदी - विक्री व्यवहार व कर्ज व्यवहारासाठी बँकेत कायदेशीर ठरणार आहे.
त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भूमी अभिलेख विभागाशी संपर्क साधावा व सनद तयार करून घ्यावी आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी उपाधीक्षक भूमी अभिलेख भगवान भोये, मुख्यालय सहाय्यक श्री. परदेशी, निमेत्तेदार दयानंद गीते, कर्मचारी सागर वानखडे, विजय गवळी व ढवळू ठाकरे यांनी नागरिकांना शासन नियमानुसार सनद वाटप केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.