नाशिक : शेतमालाच्या उत्पादनासोबत महिला शेतकऱ्यांनी शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग, ‘मार्केटिंग'सह विक्री व्यवस्थापन जाणून घ्यावे, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथे सांगितले. ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्सच्या ठक्कर डोममधील ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी रविवारी (ता.२७) पहिल्या सत्रात महिला उद्योजक, कृषी विस्तार कार्य, प्रयोगशील संशोधक, शेतकरी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अंधारे बोलत होत्या.
संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, अंकिता न्याहारकर आदी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, की यंदा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. राज्य आणि केंद्र सरकारने त्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.
परंतु विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे सुमारे ५३१ कोटी रुपये बुडवले असून न्यायालयाचे विमा कंपन्या ऐकत नाहीत. मग शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागायची? तसेच सध्याच्या काळात कोरडवाहू शेतकऱ्यांनी जगायचे कसे? शेतकऱ्यांचा वाली कोण? हे प्रश्न तयार झालेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे ठराव मांडून ‘कृषीथॉन’ च्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात यावेत. (Sushma Andhare Statement in Nashik Krishithon Knowing that women should take up processing industry management along marketing of agricultural products Nashik News)
सौ. तांबे म्हणाल्या की, नाशिक जिल्ह्यात शेतकरी हा प्रगतिशील असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांनी प्रेरणादायी प्रगती साधली आहे. त्याचप्रमाणे महिला विविध क्षेत्रात पुढे येत असून शेती आणि दुग्ध उत्पादन-पशुपालन या क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे.
शिवाय कृषी विद्यापीठाने महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ‘कृषीथॉन’ च्या माध्यमातून शेतकरी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत, हे कौतुकास्पद आहे. अश्विनी न्याहारकर यांनी प्रास्ताविक तर साहिल यांनी स्वागत केले. सुप्रिया देवघरे व आदित्य तुपे यांनी सूत्रसंचालन केले. अंकिता न्याहारकर यांनी आभार मानले.
गौरवण्यात आलेल्या पुरस्कारार्थी असे : उद्योजक : छाया कार्ट संस्था, पल्लवी चिंचवडे, कल्याणी शिंदे, रीना हिरे. कृषी विस्तार कार्य : प्रा. अश्विनी चोथे, प्रा. परमेश्वरी पवार, पूजा वाघचौरे. प्रयोगशील संशोधक : डॉ. अश्विनी चपले, डॉ. दर्शना भैसारे, डॉ. जयश्री कडू, डॉ. सोनम काळे, डॉ. नीता देवकाटे. शेतकरी : अर्चना जाधव, अश्विनी साळुंखे, भावना निकम, भावना भंडारे, मथुरा जाधव, मीना पवार, पूनम डोकळे, संगीता पिंगळे, श्वेता पाटील, वैशाली अपसुंदे, ज्योती निचित. याशिवाय बक्षीस प्रदान करण्यात आलेल्या ‘बोल भिडू‘ वक्तृत्व स्पर्धेतील विजेते असे : प्रथम क्रमांक-तेजस्विनी पांचाल (कोल्हापूर), दुसरा क्रमांक-ओमकार पिसे (ठाणे), तिसरा क्रमांक-सुनील गमे (नगर).
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
डाळिंब व्यवस्थापनातून सर्वाधिक उत्पन्न
डाळिंब सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्यासाठी डाळिंब बागांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी ‘मार्केटिंग'चे नियोजन केल्यास चांगला नफा मिळू शकतो, असे फार्म डीएसएस अॅग्रीटेक प्रायव्हेटचे संचालक डॉ. बाबासाहेब गोरे यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात प्रश्न डाळिंब उत्पादकांचे-मार्गदर्शक तज्ज्ञांचे याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, धुळे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, मखमलाबाद येथील परफेक्ट कृषी मार्केट यार्डचे अध्यक्ष बापूराव पिंगळे, अंकीता न्याहारकर आदी उपस्थित होते.
श्री. पिंगळे म्हणाले, की डाळिंब फळाला मोठी मागणी आहे. देशात आणि जगात मोठ्याप्रमाणात मागणी असल्याने आपण तेवढा पुरवठा करू शकत नाही. तसेच डाळिंबाच्या ‘मार्केटिंग'साठी शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात ‘ग्रेडिंग' आणि मालाची गुणवत्ता याची काळजी घेण्याची गरज आहे. प्रा. तुषार उगले यांनी प्रास्ताविक केले. श्री. तुपे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी सन्मान करण्यात आलेले शेतकरी याप्रमाणे : बापूराव पिंगळे, डॉ. सुयोग कुलकर्णी, किशोर वाघ, विनोद जाधव, जयवंत जाधव, कैलास बोरसे,घनश्याम अहिरे, युवराज देवरे, शिवाजी राहटळ, संजय भामरे, योगेश सावंत. प्रदर्शनाचा सोमवारी (ता. २८) समारोप होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.