crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : बंदी असलेल्या मागुर माशासह संशयित पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : शरीराला अपायकारक असल्याने शासनाने दोन वर्षांपासून बंदी घातलेला ‘थाई कॅट फिश’ अर्थात मागुर मासा घेऊन जाणाऱ्या वाहनासह संशयिताला सातपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. माशांचे अनेक प्रकार आपण पाहतो, पण त्यातला सर्वात हिंसक व अतिमांसाहारी म्हणून मागुर मासा ओळखला जातो.

मागुर माशाचे मास शरीराला अपायकारक तसेच आरोग्याचे विविध समस्या निर्माण करतो. हा मागुर मासा खाल्याने कर्करोग होण्याचा धोका असल्याने या माशाचा व्यवसाय करण्यावर तसेच त्याची विक्री करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. (Suspect is arrested by police with banned Magur fish Nashik Crime News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

परंतु, सध्या या माशांचे अनधिकृतपणे पालन करून विक्री केली जात असल्याच्या घटनांत वाढ होत आहे. नुकताच अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीन टन मासे जप्त केल्याची कारवाई केली असताना शुक्रवारी (ता. ९) सातपूर परिसरात (एमएच-१५- बीएक्स- ९१३९) या वाहनातून बंदी असलेल्या मागुर माशाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोलिस नाईक दत्तू गायकवाड, पोलिस हवालदार दीपक खरतडे, बाळासाहेब नांद्रे, सागर गुंजाळ यांनी छापा मारत वाहन व मागुर मासे ताब्यात घेतले.

यानंतर मत्स विभागाचे उपआयुक एस. टी. वाटेगावकर यांना बोलावून सदर माशाची तपासणी केली. त्यांनी सदर मासा मागुर असल्याचे सांगून या माशावर बंदी घातल्याचे स्पष्ट केले. अनधिकृतपणे हा व्यवसाय होत असल्याने याबाबत सातपूर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Assembly Election 2024 Result: मालेगाव मध्यने थंडीत फोडला घाम; जिल्ह्यातील 14 मतदारसंघांचे निकाल निर्धारित वेळेत

IND vs AUS 1st Test : OUCH! विराट कोहलीने खणखणीत Six मारला, चेंडू निवांत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आदळला, Video

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT