नाशिक

Nashik Crime News : अडीच वर्षानंतर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक; राहत होता पेहराव बदलून...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पत्नीचा खून करून फरार झालेल्या संशयित पतीला पकडण्यात मनमाड पोलिसांना ३२ महिन्यानंतर यश आले आहे. वेळापूर (ता. माळशिरस जि.सोलापूर) येथून पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली. रमेश दशरथ जाधव (वय ३२) असे संशयिताचे नाव आहे.

रमेश दशरथ जाधव (रा. प्रसादनगर, परभणी) हा त्याची पत्नी फुलाबाई रमेश जाधव (वय ३२) हिच्या सोबत रमाबाई नगर येथील रेल्वे क्वॉटर जी. २८ बी मध्ये पडक्या घरात राहत होता. या दोघा नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत होती. (Suspected killer arrested after two and half years nashik crime news)

११ जानेवारी २०२१ च्या रात्री रमेश याचे फुलाबाई हिच्याशी जोरदार भांडण झाले असता रमेश जाधव याने पत्नीच्या डोक्यावर व कपाळावर गंभीर दुखापत करून तिचा खून करत घटनास्थळावरून फरार झाला.

गेल्या अडीच वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान पोलिस निरिक्षक बाळासाहेब थोरात यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार संशयित रमेश जाधव हा त्याच्या पूर्वीच्या पत्नीच्या माहेरी डोंबारवस्ती वेळापूर येथे लपून राहत असल्याचे सांगितले. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी वेळापूर पोलिसांच्या मदतीने अटक केली.

रमेश हा वेळापूर येथे पेहराव बदलून विक्रम जाधव हे खोटे नाव धारण करून राहत होता. त्याला वेळापूर पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यास अटक केल्यानंतर त्याने खुनाच्या घटनेशी माझा काही संबंध नसल्याचे सांगितले. पण पोलिसांनी त्याच्या शरीरावरील खुणा व त्याला ओळखणाऱ्या इतर लोकांना पाचारण करून त्याची खरी ओळख पटवल्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

संशयित रमेश याच्यावर परभणी तसेच मुकुंद नगर पोलिस (जि. छत्रपती संभाजीनगर) मध्ये विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच रेल्वेत पाकिट मारी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरिक्षक बाळासाहेब थोरात, सहाय्यक निरिक्षक एकनाथ भिसे, पोलिस कर्मचारी राजेंद्र खैरनार,भाऊराव कोते, रणजित चव्हाण यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT