नाशिक : पंचवटीतील गोरेराम मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी पैशांची गरज असलेल्या महंतांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जादा परतावा मिळावा असे आमिष दाखवून तिघा संशयितांनी तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Suspects cheat Mahant of 40 lakhs lure of excess returns from stock market Nashik Cyber Crime)
राजू अण्णा चौघुले, रोहन राजू चौघुले (दोघे रा. चौघुले निवास, अशोकनगर, सातपूर), श्रीमती भारती युवराज शर्मा (रा. स्वामी नारायण मंदिराजवळ, नाशिक) अशी संशतियांची नावे आहेत.
महंत राजारामदास गुरु श्री शालिग्रामदास वैष्णव (रा. गोरेराम मंदिर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ते सितागुंफा रोडवरील गोरेराम मंदिराचे महंत आहेत.
त्यांना मंदिराचा जिर्णोद्धार करायचा होता. परंतु पैशांची कमतरता होती. या दरम्यान त्यांची संशयितांशी ओळख झाली. संशतियांनी महंत राजारामदास गुरु यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यातून चांगला परतावा मिळू शकतो.
त्यातून मंदिराचे जिर्णोद्धारही होईल असे आमिष दाखविले. महंतांचाही संशयितांवर विश्वास ठेवला. त्यासाठी महंतांनी वेळोवेळी रोख स्वरुपात तर कधी ऑनलाईन स्वरुपात पैसे दिले.
असे आत्तापर्यंत ४० लाख रुपये संशयितांना दिले. संशयितांनी या पैशांबाबत बनावट करारनामाही करीत त्यावर महंतांची बनावट स्वाक्षरीही केली. प्रत्यक्षात संशयितांनी महंतांना गुंतविलेल्या पैशांचा कोणताही परतावा दिला नाही.
उलट त्यांच्या पैशांचा अपहार करीत त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार, पंचवटी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.