Swabhimani Farmers Association threw tomatoes on Niphad highway nashik news esakal
नाशिक

Nashik Tomato Rate Fall : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; निफाडला महामार्गावर फेकला टोमॅटो

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rate Fall : गेल्या तीन-चार दिवसांपासून टोमॅटोला अवघा दोन ते तीन रुपयांचा किलोला दर मिळत आहे.

त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त झालेले असताना शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण असल्याने शनिवारी (ता. १६) निफाडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत नाशिक छत्रपती संभाजी महाराज महामार्गावर टोमॅटो फेकत आक्रोश व्यक्त करण्यात आला.

या वेळी निफाडचे पोलिस निरीक्षक महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो कवडीमोल दराने विकला जात आहे. (Swabhimani Farmers Association threw tomatoes on Niphad highway nashik news)

अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर देखील फेकला आहे. उत्पादन खर्चच फिटत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

अशा परिस्थितीत शासनाने नाफेडमार्फत टोमॅटोची खरेदी करावी, टोमॅटोला पन्नास रुपये किलोचा दर द्यावा, तसेच शासनाने व केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा विचार करत टोमॅटोला २५ रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे यांसह अन्य मागण्यासाठी शनिवारी सकाळी अकराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवृत्ती गारे यांच्या नेतृत्वाखाली निफाडला छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरील शांतिनगर चौफुलीवर टोमॅटो फेकत आंदोलन करण्यात आले.

या वेळी केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासनाच्या चुकीचा धोरणांचा निषेध करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर निफाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, सरचिटणीस सागर गवळी, मनसेचे अब्दुलभाई शेख, दत्तात्रय सुडके, युवा क्रांती शेतकरी संघटनेचे संजय पाटोळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सागर निकाळे, सुनील कापसे, साहेबराव शिंदे, रामदास तासकर, योगेश पोटे, ज्ञानेश्वर तासकर, मच्छिंद्र रोटे, सुनील घोटेकर, योगेश घोटेकर, दीपक घोटेकर, धीरज तासकर आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

"शासनाने नाफेडमार्फत टोमॅटोची खरेदी करावी. टोमॅटोला पन्नास रुपये किलोचा दर द्यावा. टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत असताना त्यांचे अश्रू पुसावेत. पिकावर शासनाचे निर्बंध लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने न्याय द्यावा अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करावा लागेल." - निवृत्ती गारे, अध्यक्ष- स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT