sambhaji raje chhatrapati  esakal
नाशिक

Nashik Election: स्वराज्य संघटनेची निवडणूक तयारी; संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत उद्यापासून मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून स्वराज्य संघटनेचा भव्य मेळावा २४ व २५ जूनला नाशिकमध्ये होत असून या मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

गेल्या दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने तळागाळातील कार्यकर्ता हतबल झाला आहे. (Swarajya Sangathan Election Preparation from tomorrow in presence of Sambhaji Raje Chhatrapati nashik news)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याबाबत शासन का असली तरी विधानसभा व लोकसभा निवडणुकीची तयारी राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षदेखील सावध झाले असून नव्याने स्थापन झालेल्या स्वराज्य संघटनेकडूनदेखील कार्यकर्त्यांच्या मेळाव्या निवडणुकांचा आढावा घेतला जाणार आहे.

त्यासाठी स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या दोन दिवसांचा नाशिक दौरा निश्चित झाला असून या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यात जिल्ह्यातील २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभा नाशिक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संदर्भात आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विचार जागर स्पर्धाचे बक्षीस वितरण

निवडणुका लढविण्यासंदर्भात संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून आपल्या मतदारसंघातील स्वराज्य पक्षाची सध्याची परिस्थिती व पुढील वाटचाल संदर्भात अहवाल तयार केला जाणार आहे.

छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रम होतील. २४ जूनला नांदूर नाका येथील यश लॉन्स येथे सांयकाळी चार वाजता मेळावा होईल. २५ जूनला

सकाळी दहा वाजता रावसाहेब थोरात सभागृहात छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या बक्षीस वितरण होईल.

दुपारी एक वाजता कालिदास कलामंदिरात राजश्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण होईल, अशी माहिती स्वराज्य संघटनेचे संपर्क प्रमुख करण गायकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT