नाशिक : शाळा बंद झाल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचं दप्तर घ्या, बकऱ्या द्या हे आंदोलन सध्या नाशिकमध्ये होत आहे. बंद झालेली शाळा सुरू करण्यासाठी हे आंदोलन विद्यार्थी करत आहेत. दरेवाडीमधली जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने हे विद्यार्थी संतापून आंदोलन करत आहेत. (Take away School give us goats nashik ZP school students protest)
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या दरेवाडी इथले विद्यार्थी आज जिल्हा परिषदेसमोर जमले आहेत. दरेवाडीमधली जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी या मोर्चाद्वारे केली आहे. या आधीही या शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळा सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. मात्र शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नव्हती.
त्यामुळे आपल्या बकऱ्या घेऊन हे विद्यार्थी जिल्हा परिषदेसमोर गोळा झाले आहेत. बकऱ्या द्या, दप्तर घ्या, अशा घोषणा हे विद्यार्थी देत आहेत. गेल्या काही काळापासून पटसंख्या कमी असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचं धोरण सरकारकडून राबवण्यात येत आहे. या धोरणाला सातत्याने विविध भागांमधून विरोध केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.