Community members gather in front of Chhatrapati Shivaji Maharaj statue at CBS for support. esakal
नाशिक

Manoj Jarange Patil Pune : रसद सोबत घेत मराठा समाज पुण्याच्या दिशेने रवाना

उदघोषणांचा जयघोष करत नाशिकमधून सकल मराठा समाज बुधवारी (ता.२४) पुण्याच्या दिशेने रवाना झाला.

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Pune : ‘लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे,’ ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘एकच वारी मुंबईवर स्वारी’ अशा उदघोषणांचा जयघोष करत नाशिकमधून सकल मराठा समाज बुधवारी (ता.२४) पुण्याच्या दिशेने रवाना झाला.

जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून संकलित झालेले धान्य, तेलाचे डबे, शेंगदाणे आदींच्या गाड्या भरलेली रसदही सोबत घेतली आहे. (Taking logistics with them Maratha community left for Pune manoj jarange patil nashik news)

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण मोर्चा मुंबईच्या दिशेने जात आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिकचे समाजबांधव पुण्याकडे रवाना झाले. मंगळवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता सीबीएस येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिवस्मारक ते मुंबई नाका या ठिकाणापर्यंत पायी रॅली निघाली. शेकडो वाहनांनी हा मोर्चा नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पुढे मार्गस्थ झाला.

या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हे आरक्षण प्रश्र्नी वेळकाढूपणा करत आहेत. जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ते दोन दिवसात देऊ शकतात. सरकारने पावले उचलली तर मराठ्यांचे हे वादळ मुंबईत येण्यापासून ते रोखू शकतात.

परंतु, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलली नाही तर मराठा वादळ हे निश्चित मुंबई काबीज करतील. होणाऱ्या परिणामांना मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला. नानासाहेब बच्छाव यांनी सरकारने अंत पाहू नये, अशी विनंती या वेळी बोलताना व्यक्त केली.

राठा आरक्षण मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिकमधून निघालेले सकल मराठा समाजबांधव. दुसऱ्या छायाचित्रात सीबीएस येथून पुण्याकडे धान्य व साहित्य घेऊन निघालेले टेंपो.

या वेळी शिवाजी सहाणे, चंद्रकांत बनकर, सुनील बागूल, राजू देसले, नितीन रोटे पाटील, आशिष हिरे, डॉ. सचिन देवरे, योगेश नाटकर, व्यंकटेश मोरे, सोमनाथ जाधव, मामा राजवाडे, अजय बागूल, नीलेश मोरे, सचिन पवार, संजय पडवळ, राम पाटील, वैभव दळवी, उल्हास बोरसे, कैलास खांडबहाले, एकता खैरे, शिल्पा चव्हाण, ममता शिंदे, पुंडलिक बोडके, ज्ञानेश्वर कवडे, नीलेश ठुबे, ज्ञानेश्वर सुराशे, संदीप कुटे, राम निकम, प्रफुल्ल वाघ, अजित नवले, विक्रांत देशमुख, अमित नडगे, भारत पिंगळे, कृष्णा धोंडगे, बालाजी धोंडगे, बाळासाहेब लांबे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT