talathis will now have to give attendance schedule jalgaon news esakal
नाशिक

Nashik News : तलाठ्यांना द्यावे लागणार उपस्थितीचे वेळापत्रक; नागरिकांची धावाधाव थांबणार

विजय पगारे

Nashik News : गावपातळीवर तमाम नागरिकांच्या जमिनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणाऱ्या तलाठ्यांना आता त्याच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामस्तरावर द्यावे लागणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात ते कधी उपस्थित राहणार, याचा आठवड्याचा तक्ता लावण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.

आपल्या गावात तलाठी कधी येणार? विविध कार्यक्रम, दौरा काय असेल याबाबतची माहिती ग्रामस्थांना यातून मिळेल. तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने तसेच सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याने हा आदेश पारित करण्यात आला आहे. (talathis will now have to give attendance schedule nashik news)

तलाठ्यांना सज्जातील गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळ पाहणे, वरिष्ठ कार्यालयांमध्ये असणाऱ्या बैठका, तपासण्या आदी कामांसाठी उपस्थित राहावे लागते. सध्या तलाठींच्या रिक्त जागांमुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. अनेकदा सज्जा मुख्यालयीन कार्यालयांमध्ये तलाठ्यांना उपस्थित राहता येत नाही. परिणामी, नागरिकांची गैरसोय होते.

अनेक कामांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. आता वेळापत्रकाबरोबरच तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल, अशा स्वरूपात लावण्यासही सांगण्यात आले आहे. संबंधित वेळापत्रक मंडल अधिकारी व नायब तहसीलदार यांनाही पाठविण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

गावपातळीवर तलाठी हे नागरिकांसाठी महत्त्वाचे पद असल्याने वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांसाठी, जमीनविषयक कामांसाठी नागरिकांचा तलाठी कार्यालयाशी संपर्क येतो. सद्यस्थितीत राज्यात तलाठ्यांची पाच हजार १३८ पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया सुरू असून, ही पदे भरली जाण्यास उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाईल.

त्या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महसूल विभागाने परिपत्रक जारी केले आहे. जिल्ह्यासाठी ७०७ तलाठी पदे मंजूर आहेत, मात्र सध्या ४४१ तलाठी कार्यरत असून, ३४६ पदे रिक्त आहेत. तलाठीपदाच्या ३४६ रिक्त जागांमुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जांचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यामुळे त्यांचा कामाचा भार वाढला आहे.

तालुकानिहाय कार्यरत तलाठी

इगतपुरी : ६५, कळवण : ७१, दिंडोरी : ७९, बागलाण : ६४, चांदवड : ६७, नाशिक : ६१, निफाड : १३२, येवला : ९५, मालेगाव : ७७.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT