tanker water On Onion live yeola taluka sakal
नाशिक

नाशिक : टॅंकरच्या पाण्यावर जगवताहेत कांदा!

येवला तालुका : विहिरी अचानक कोरड्या, पुन्हा जुगारच

सकाळ वृत्तसेवा

येवला : पावसाळ्यात धो-धो पावसामुळे जमिनीना उपळ आला, विहिरी तुडुंब भरल्या परिणामी यंदा उन्हाळ्यापर्यत पुरेसे पाणी राहील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची पिके घेतली आहे. पण गेल्या महिन्यापासून राजापूरसह पूर्व भागात विहिरी अचानक कोरड्या पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात उभे असलेले कांद्याचे पीक जगवण्यासाठी तीन ते चार हजार रुपये दराने टँकर विकत घेऊन पाणी देण्याची वेळ आली आहे.

ब्रिटिशकालिन दुष्काळी असलेल्या तालुक्याच्या पूर्व भाग अवर्षणप्रवण असून डोंगरी भाग असल्याने कितीही पाऊस झाला तरी पाण्याची साठवण क्षमता नसल्याने पाणी उताराच्या दिशेने वाहून जाते. परिणामी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येथे टंचाई डोके वर काढते. यामुळेच या भागात आठमाही शेती करणेही अवघड होत आहे. यावर्षी तर पावसाळ्यात धोधो पाऊस पडल्याने पंधरा दिवसापेक्षा अधिक कालावधीत पिके पाण्यात उभी होती. बंधारे-विहिरी तुडूंब भरल्याने यावर्षी फेब्रुवारी, मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र दिवाळीनंतर वाढत्या उन्हासोबत पिकांना पाण्याची गरज भासू लागली आणि उपसा सुरू होताच महिन्यापासून अचानक विहिरींनी तळ गाठला.आजमितीस तर अनेक विहिरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना आता काही क्षेत्रातील कांद्याचे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.

तालुक्याची पर्जन्याची वार्षिक सरासरी ५१२ मिलिमीटर असताना यावर्षी तब्बल ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे डोंगराळी उत्तर पूर्व भागात तर पावसाचे प्रमाण सर्वाधिक असतानाही पाणी आटल्याने शेतकऱ्यांना भविष्याची चिंता उभी राहिली आहे.आता शेतातील पिके जगविण्यासाठी टँकरने पाणी विकत घेऊन ते देत शेतकरी कांद्याला जगविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा वाचवण्यासाठी टँकरला पसंती दिली आहे. २४ हजार लिटरच्या टँकरला साडे तीन ते चार हजार रुपये खर्च करून पाणी विकत घेऊन आणून कांदे जगविण्यासाठी धडपड सुरू आहे.

विहिरी, बोअरवेल्ससह शेततळ्यात पाणी असलेले शेतकऱ्यांनाही जपून पाणी वापरण्याची वेळ आली आहे. कांद्याला एक भरणीसाठी पंधरा ते वीस हजाराच्या आसपास खर्च येत असून सध्या कांद्याला बाजारभाव चांगले असल्याने शेतकरी विकतचे पाणी घेऊन जुगार खेळत आहेत. कांदा काढणीस आल्यानंतर बाजारभाव टिकून राहिल कि नाही याची शास्वती नाही पण शेतकरी जुगार खेळत आहेत. किमान दोन भरणीसाठी तीस ते चाळीस हजार खर्च येणार आहे.

''सलग दुसऱ्या वर्षीही जोरदार पाऊस होऊनही कांद्याना टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. मागील वर्षीपेक्षा डिझेल पेट्रोल, महागाई भरमसाठ वाढ झाली असल्याने व टॅकर भरण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. यावर्षी साडेतीन ते चार हजार रुपये प्रमाणे टॅंकर घ्यावा लागतोय."

- ज्ञानेश्वर काळे, टॅकरमालक,ममदापूर

"पेरणी, लागवड केलेला कांदा वाचवण्यासाठी पाणी नसल्याने आता टॅंकरशिवाय पर्याय नाही. टॅंकरने विकत पाणी घेऊन कांदा वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. दोन भरणीसाठी पंधरा ते वीस हजाराच्या आसपास खर्च झालेला आहे. कांदा बाजारभाव चांगले मिळतील या अपेक्षेने पीक वाचवण्याचा प्रयत्न करतोय."

- सुभाष अलगट, शेतकरी, राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT