Tattoo Business : सध्या सुमारे सत्तर टक्क्यांहून अधिक मुला-मुलींच्या शरीरावर टॅटू असल्याचे दिसतेय. आजकाल तरुणाईसोबत सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये टॅटूची क्रेझ वाढताना दिसत आहे.
त्यामुळे टॅटू काढणाऱ्या कलाकारांची संख्या वाढत आहे. यामध्ये उत्पन्न चांगले असल्याने मुले-मुली रोजगार म्हणून पाहत आहेत. परिणामी काही वर्षापूर्वी शहरात असलेले टॅटू आर्टिस्ट शॉप आता ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने दिसत आहे.
आकर्षक व रंगीत टॅटूची भुरळ वाढत असल्याने कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. (Tattoo Business craze attracts youth Artists getting employment nashik news)
टॅटू काढणे ही आजची फॅशन असली तरी ही कला इतिहास पूर्व काळापासून चालत आली आहे. फरक फक्त इतकाच होता की पूर्वी त्यास गोंदण म्हणून ओळखले जात होते. पूर्वी सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने त्वचेवर नक्षी काढणे, चिन्ह, चित्र टोचून घेत होते.
आजही जत्रा, यात्रामध्ये गोंदण काढणारे कलाकार दिसून येतात. गोंदणामध्ये शरीरावरील ठराविक भागावर नावे, देवतांच्या प्रतिमा तसेच महिला सौंदर्य खुलावे यासाठी हनुवटी, ओठावरील भागावर तीळ गोंदवून घेत असत.
मात्र त्यामधून संक्रमणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांनी गोंदणाकडे पाठ फिरवली होती. सध्या सुरक्षित साधनांच्या वापरामुळे गोंदणाची सुधारित आवृत्ती म्हणून टॅटूची क्रेझ वाढत आहे.
सध्या काढण्यात येणाऱ्या टॅटूमध्ये तात्पुरते आणि कायमस्वरूपी असे दोन प्रकार दिसून येतात. गोंदणाच्या तुलनेत टॅटू बनवण्यासाठी विविध कलरची शाई वापरली जाते, त्यामुळे चित्र, डिझाईन अधिक आकर्षक दिसते. तरुणाई टॅटू शरीराच्या कोणत्याही भागावर काढताना दिसतात. टॅटूमध्ये स्वतःचे किंवा
जीवलगांचे नाव, नवनवीन प्रकारचे चित्र आणि रंगीत सिम्बॉल काढून घेण्याकडे अधिक कल असतो. एकंदरीत वाढत्या टॅटूच्या क्रेझमुळे कलाकारांना चांगले दिवस येताना दिसत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काळजी घेणे आवश्यक
टॅटू बनवण्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे असते ती त्याची काळजी घेणे. तुम्ही शरीरावर टॅटू करून घेता, त्यावेळी टॅटूच्या मशिनची सुई शरीरातील भागावर सतत छेद करत असते. त्यामुळे शरीरामध्ये अनेक लहान आकाराच्या जखमा होतात. या जखमांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर संक्रमणाचा धोका संभवू शकतो.
"ग्रामीण भागात टॅटू काढण्यासाठी अनेक मुलं मुलींसह महिलांचे प्रमाणही अधिक आहे. देवतांच्या चिन्हासह विविध प्रकारचे चिन्ह गोंदण्यासाठी मागणी आहे."
- राणी संतोष सूर्यवंशी, ओम साई टॅटू, चांदोरी.
"बदलत्या काळानुसार गोंदण कला टॅटूच्या स्वरूपात नव्याने अनुभवायला मिळतेय. सुरक्षित असल्याने हातावर तात्याश्री नाव गोंदवून घेतले." - दर्शन टर्ले, चांदोरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.