नाशिक

Nashik Fraud Crime: मालेगावच्या कर सल्लागाराला बनावट पावत्याप्रकरणी अटक; 86 कोटींचे बनावट इनव्हॉइस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रिय सहभागी नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात राज्य वस्तू व सेवाकर विभागास यश आले आहे.

सौरभ बुरड (जैन) असे संशयित वस्तू व सेवाकर सल्लागाराचे नाव आहे. (Tax consultant of Malegaon arrested in case of fake invoice nashik fraud crime news)

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी संशयिताला १० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आर्थिक वर्षातील या २१ व्या अटकेने राज्य वस्तू व सेवाकर विभागाने बोगस रॅकेट व्यवस्थापक करचोरी करणाऱ्यांविरुद्ध प्रभावीपणे कारवाई केली असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

व्यावसायिक सल्लागाराचा फसव्या व्यवहारांशी थेट संबंध उघडकीस आल्याने विभागाकडून नोंदणीकृत वस्तू व सेवाकर कर सल्लागाराची ही पहिली अटक आहे. प्राथमिक तपासात सौरभ बुरड यांनी ९ वेगवेगळ्या संस्थांचा वापर करून ८६.६० कोटी पेक्षा जास्त किमतीच्या बोगस पावत्या जारी केल्या आणि त्याद्वारे एकूण १०.३९ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट पास केल्या आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.

सौरभ वर्धमान बुरड (जैन) नोंदणीकृत (जीएसटी) कर सल्लागार आणि (जीडीसीए) आहे. त्यांच्याकडे उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा मासिक डेटा सहज उपलब्ध होता. या डेटाच्या मदतीने केवळ बुरड या व्यावसायिकांचे मासिक विवरणपत्र भरत होते. या प्रक्रियेदरम्यान बुरड या करदात्यांच्या नियमित उलाढालीमध्ये इतर बोगस उलाढाल जोडत होते.

काही व्यावसायिकांच्या माहिती शिवायही बनावट पावत्या आणि त्यांच्या नोंदी जीएसटी आर (१) मध्ये जारी करत होते. या बनावट इनव्हॉइसचा वापर इतर करदात्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे वास्तविक कर दायित्व कमी करण्यासाठी किंवा काही प्रकरणांमध्ये ‘इन्व्हर्टेड ड्यूटी स्ट्रक्चर’मध्ये काल्पनिक आणि बोगस परताव्याचा दावा करण्यासाठी केला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT