vaishali zankar esakal
नाशिक

'त्या' शिक्षकाचे अखेर निलंबन; जि.प.सीईओंची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर झनकर यांना पोलिसांनी (nashik police) अखेर अटक केली आहे. गेल्या महिन्यात संशयित वैशाली वीर-झनकर यांनी ३२ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनापोटी नऊ लाख रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी केली होती. याच प्रकरणी ९ लाखांची लाच घेतल्या प्रकरणी सहभागी असलेला जिल्हा परिषदेचा (zilla parishad teacher) शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (leena bansod) यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींनी काढले आदेश

जिल्हा परिषदेचा (zilla parishad teacher) शिक्षक पंकज रमेश दशपुते हा नाशिक तालुक्यातील राजेवाडी शाळेवक प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर येवले व दशपुते यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. नंतर येवले व दशपुते यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. नंतर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या फरार झाल्या होत्या. त्यानंतर त्या ACB समोर हजर झाल्या. त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दशपुते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत बनसोड यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत.

मालमत्तांची चौकशी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांच्या घरांची झडती घेतली असून, यापैकी वीर यांच्या नावे वेगवेगळ्या ठिकाणी चार फ्लॅट, जमीन, कार, दुचाकी तसेच ४० हजारांची रोकड आणि काही बँकांचे पासबुक असल्याचे आढळून आले. वीर यांच्या घराच्या झडतीत त्यांच्या नावे मुरबाड, कल्याण रोड येथे एक फ्लॅट, नाशिक, शिवाजीनगर येथे एक फ्लॅट, सिन्नरला ०.५७ गुंठे जमीन, मिलिंदनगर, कल्याण ३१.७० गुंठे, १०.०८ गुंठे, ४०.८० आणि १३.१० गुंठे जमीन, सिन्नरमध्येच आणखीन ०.५६ गुंठे, ०१.५१ गुंठे, ०३.४१ गुंठे जमीन असून, कल्याण गंधारे येथे एक फ्लॅट, नाशिकला गंगापूर रस्त्यावर एक फ्लॅट, सिन्नरमध्ये ०.२२.७० गुंठे क्षेत्राची मालमत्ता, ४० हजारांची रोकड, होंडा सिटी कार, दुचाकी आणि वेगवेगळ्या बँकेचे पासबुकही मिळाले आहेत.

इतर दोघांच्या मालमत्तांची चौकशी

संशयित येवले यांच्या घरझडतीत त्यांच्यासह पत्नी आणि मुलांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेच्या पासबुकसह दोन गाड्यांचे आरसीबुक मिळाले आहे. दशपुते यांच्या नावे नाशिक येथे ते राहत असलेला टू बीएचकेचा फ्लॅट, दुचाकी आणि तीन बँक खाती असल्याची बाब समोर आली आहे. मालमत्तांचा शोध सुरूच असून, झनकर यांच्या अटकेनंतर आणखी काही बाबी समोर येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रमाणीत उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्यास संबंधितांना या मालमत्तेचा स्त्रोतही स्पष्ट करावा लागतो; अन्यथा अपसंपदा जमा केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ‘एसीबी’तर्फे राबविली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT