teacher recruitment latest news esakal
नाशिक

शिक्षक भरती आता MPSCच्या धर्तीवर; पुढील भरती नव्या पद्धतीनुसारच होणार

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : गेल्या काही महिन्यांपासून पवित्र पोर्टल व शासनाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Teacher recruitment now on MPSC lines next recruitment will be done according to new method nashik Latest Marathi News)

राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने २०१९ मध्ये १२ हजार पदांची भरती पवित्र संकेत स्थळामार्फत सुरू करण्यात आली.

भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यामार्फत शिक्षकांची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव, एमपीएससीचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मात्र एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियाही पूर्ण होईल.त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

शिक्षण आयुक्तांचा अभिप्राय

एमपीएससी ही राज्यातील विविध पदभरती प्रक्रिया राबवण्यातील अनुभवी संस्था आहे.त्याशिवाय ही शासनाचीच संस्था आहे. एमपीएससीकडून पारदर्शक,गुणवत्तापूर्ण पद्धतीने प्रक्रिया राबवली जात असल्याने एमपीएससीची विश्वासार्हता आहे.त्यामुळे एमपीएससीकडून शिक्षक भरती प्रक्रिया राबवल्याचा गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळण्यास मदत होईल,असे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

"शिक्षक भरती एमपीएससीमार्फत राबवल्यास भरती प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त, विनाविलंब पार पडेल. एमपीएससीमार्फत शिक्षक भरतीची योग्य कार्यवाही व पारदर्शक पध्दती राबवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव केला आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेऊन अभियोग्यता धारकांना न्याय द्यावा.अशी अपेक्षा आहे."

- अर्चना सोनवणे-शिंदे, अभियोग्यता धारक विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT