विखरणी (जि.नाशिक) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona virus pandemic) अनेकजण खुल्या हाताने आर्थिक स्वरूपात (helping hand) दान करत आहेत. सामाजिक जाण असलेल्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (school teacher) शिक्षकानेही दातृत्वपणा दाखवला आहे.
सामाजिकपणाची जाण शिक्षकाचा दातृत्वपणा
मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत मागील वर्षी बऱ्याच दात्यांनी गरजूंना मदत केली. मात्र, जसजसा कोरोनाचा प्रकोप वाढत गेला तसतसा मदतीचा ओघ कमी होत गेला. सद्यःस्थितीत अनेक रुग्ण ऑक्सिजन, औषध उपचाराअभावी दगावत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. अशा बिकट स्थितीत आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीने अनेक शिक्षक बांधवांनी देखील वर्गणी, रोख स्वरूपात शासनदरबारी निधी जमा केलेला आहे.
कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात
त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाटोदा शाळा क्रमांक एकचे शिक्षक किशोर ज्ञानदेव लांडगे यांनी समाजातील गरजूंना मदत मिळावी व शासनास अर्थसहाय्य करण्याच्या हेतूने मे महिन्यापासून प्रत्येक महिन्याचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक जाण असलेल्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकानेही प्रत्येक महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा संकल्प करून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे
समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न
कोरोनाग्रस्तांना मदतीची गरज आहे. अनेक कुटुंबांना रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. त्यांना हातभार लागावा, या हेतून आपण मे महिन्यापासून प्रत्येक महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार आहोत. या संकल्पाने समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. -किशोर लांडगे, उपशिक्षक, प्राथमिक शाळा, पाटोदा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.