NMC esakal
नाशिक

Nashik News: महापालिकेचा अभ्यास करण्यासाठी ऑक्टोबरअखेर येणार केंद्राचे पथक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेची आर्थिक स्थिती, पायाभूत सुविधा, भविष्यातील संधी त्याचप्रमाणे वाढत्या शहर विस्ताराच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या कमिटी ऑफ फायनान्शिअल फॅसिलिटी ऑफ इंडियाचे पथक ऑक्टोबरअखेर येणार आहे. (team from Center will come at end of October to study NMC nashik)

गृहनिर्माण मंत्रालयाच्या अखत्यारीत कमिटी ऑफ फायनान्शिअल फॅसिलिटी ऑफ इंडिया हा विभाग आहे. देशभरातील महापालिकांचे आर्थिक परिस्थितीचा अभ्यास या कमिटीच्या माध्यमातून केला जातो. नाशिक शहर वेगाने वाढणारे शहर आहे.

लोकसंख्येच्या वाढीचा दर अधिक असून सद्यःस्थितीत शहराची अंदाजित लोकसंख्या बावीस लाखांच्या आसपास असल्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, शहरात निर्माण होणारा कचरा व त्याची विल्हेवाट, शहरातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न, महापालिकेचे कर, उत्पन्न, पायाभूत सुविधांवर होणारा खर्च व त्याबदल्यात प्राप्त होणारे उत्पन्न याचा अभ्यास कमिटीमार्फत होणार आहे.

महापालिकेला आवश्‍यकता भासल्यास कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचीदेखील तजवीज कमिटीमार्फत केली जाते. विशेष करून महापालिकेला प्राप्त होणारे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळाचा अभ्यास कमिटीमार्फत केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT