A new leader like Aditya Thackeray asked every detail about the crop and the expenses he would incur. esakal
नाशिक

Aditya Thackeray Daura: दुष्काळी स्थिती मांडताना शेतकरी बांधवांचे अश्रू अनावर; आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा

वडांगळी : ओझर शिर्डी महामार्गावरील हिवरगाव कोमलवाडी ता सिन्नर येथील दुष्काळ ग्रस्त शेतकरी बांधवाच्या बांधावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला. शेतकरी बांधवांना स्वतः ची दुष्काळी ची व्यस्था मांडताना रडू कोसळले.

सिन्नरचा दुष्काळी अन् डोळ्यांसमोर उभे पीक जळाले ही व्यथा ऐकून उपस्थित राजकीय नेत्यांची मने हेलावली. आदित्य ठाकरे सारख्या नवख्या नेत्याने कोणते पिक ते त्याला येणारा खर्च प्रत्येक बाबी बारकाइने विचारल्या. (Tears of farmers in drought situation Aditya Thackeray interaction with farmers of nashik in vadangali)

शेतकरी बांधवांकडून शेतात भारतीय बैठक मांडत जाणून घेतल्या आहे. शेतकरी बांधवांनी शेतात जळालेले सोयाबीन पिकांच्या काढ्या ठाकरे यांना दाखवत, बघा साहेब, हा आहे सिन्नरचा दुष्काळ, सांगा तुम्ही हेक्टरी किती अनुदान पाहिजे? एकरी साडे बावीस हजार सोयाबीन पिक उभारणीचा खर्च आहे.

असे घंगाळवाडीचे शेतकरी सलीम शेख यांच्या सह शेतकरी बांधवांनी संगितले. सिन्नरच्या दुष्काळी स्थिती पाहणी दौरा आदित्य ठाकरे यांनी केला.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, निफाडचे माजी आमदार अनिल कदम, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, नाशिकचे सुधाकर बडगुजर भारत कोकाटे, यांच्या सह विविध उबाठा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निफाडहून भेंडाळी मार्गे हिवरगाव टोमॅटो बाजार समितीच्या आवारात शेतकरी बांधवांशी पहिल्यांदा श्री. ठाकरे यांच्याशी संवाद साधला. खडांगळीचे शेतकरी अर्जुन कोकाटे यांनी टोमॅटोला घसरलेल्या भावाविषयी नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने किमान पाचशे रुपये दराने टोमॅटो खरेदी करावी तर शेतकरी बांधवांचा खर्च निघून येईल असे सांगितले. श्री. ठाकरे यांचा वडांगळी शेतकरी संवाद साधणार होते. मात्र धावती भेट वडांगळीला दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वडांगळीच्या बसस्थानक परिसरात पुर्वेकडील गावांमधील दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. ठाकरे यांनी एक शब्दाचा संवाद न साधता इगतपुरी च्या दिशेने ताफा सुसाट वेगाने गेला.

तत्पुवी वडांगळीच्या हिवरगाव रस्त्याला शेतकरी शांताराम निवृत्ती खुळे यांचे सोयाबीन शेतात श्री ठाकरे यांनी भेट देऊन शेतकरी संवाद साधला.

"ठाकरे सरकारच्या काळात दोन लाखापुढे शेतकरी कर्ज माफी देण्यात आली. पण एक रुपया माफी झाली नाही. शेतकरी कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यासाठी प्रयत्न करावे."

- कैलास खुळे शेतकरी, वडांगळी

"माझे सोयाबीन पिक दोन महिने झाले आहे. दहा बीघे सोयाबीन पाऊस नसल्याने सोयाबीन ची वाढ खुटली आहे. शासनाने भरीव नुकसान भरपाई घ्यावी"

- शांताराम खुळे, शेतकरी, वडांगळी.

"घंगाळवाडी भागात सोयाबीन उभे पिक जळून गेले आहे. वावरात सोयाबीन च्या वाळलेल्या काढ्या आहे." -सलीम शेख, शेतकरी, घंगाळवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT