Nashik Winter Update: शहरासह जिल्हाभरात थंडीचा जोर वाढला असून, सकाळी दाट धुके, दिवसभर ढगाळ वातावरणासह गार वारा वाहत होता.
बुधवारी (ता. ६) मालेगावचे कमाल तापमान २५.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, राज्यातील हे नीचांकी तापमान आहे. (temperature of Malegaon is lowest in state nashik news)
सध्या वातावरणात गारवा जाणवत असताना दिवसभर ढगाळ वातावरण राहात असल्याने सूर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. पुढील दोन-तीन दिवस अशाच प्रकारे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागायामार्फत वर्तविला जात आहे.
सायंकाळनंतर वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. काही दिवसांपासून वातावरणात गारठा जाणवू लागला आहे.
तापमानात फारशी घसरण झालेली नसली तरी वातावरणात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता जाणवत आहे.
कमाल तापमानात मोठी घसरण सुरू झालेली बघायला मिळत आहे. बुधवारी (ता. ६) नाशिकचे किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २५.७ अंशापर्यत नोंदविले गेले आहे. आगामी काही दिवस तापमानात घसरण सुरूच राहण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस थंडीचा चांगलाच तडाखा जाणवू शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.