Nashik Kalaram Mandir esakal
नाशिक

Nashik Kalaram Mandir : शहरातील मंदिरांना चोख पोलिस बंदोबस्त; काळाराम मंदिरात भाविकांची होणार गर्दी

नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरासह विविध मंदिरांमध्येही महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kalaram Mandir : अयोध्येत सोमवारी (ता.२२) होणाऱ्या रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरासह विविध मंदिरांमध्येही महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

यामुळे मंदिरांसह रामतीर्थांवरही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. (temples in city are well police settlement due to ram mandir nashik news)

या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जागोजागी पोलिस तैनात असणार आहेत. तसेच, मंदिर प्रशासनांनाही धार्मिक कार्यक्रम आयोजनासाठी पोलिस परवानगी अनिवार्य केली आहे. शहरात सर्वाधिक मंदिरे पंचवटी परिसरात आहेत. त्यात प्रसिद्ध श्री काळाराम मंदिराचा समावेश असून, अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाविकांची गर्दी वाढली आहे. तसेच, सोमवारी (ता.२२) देखील श्री काळाराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेषत: पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर, गोरेराम मंदिरासह रामतीर्थ परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याशिवाय पंचवटीतील विविध मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमांसह प्रसादाचे आयोजन केले आहे.

यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा पोलिस ठाण्यांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, जादा पोलिसही शहरात ठिकठिकाणी तैनात केले आहेत.

पाचशे पोलिसांचा फौजफाटा

गोदाघाट, तपोवन या परिसरातही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून या ठिकाणीही बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्त व पोलीस अधिकारी-कर्मचारी असे सुमारे ५०० पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. तसेच मंदिरांमध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसह प्रसाद वाटप, ध्वनीक्षेपक लावण्यासाठी संबंधित मंदिर व्यवस्थापनांना नजिकच्या पोलिस ठाण्यांची परवानगी बंधनकारक केली आहे.

''पंचवटीतील श्री काळाराम मंदिरासह धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस सतर्क आहेत.''- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT