The lighting and decoration done to the Shri Ram temple located at Savata Chowk in Sangameshwar area here. esakal
नाशिक

Ayodhya Ram Mandir : बजाओ ढोल स्वागत में... मेरे घर राम आये है! ठिकठिकाणी आज, उद्या शोभायात्रा

अयोध्या येथे सोमवारी (ता. २२) होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहर आणि संपूर्ण ‘कसमादे’ परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथे सोमवारी (ता. २२) होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहर आणि संपूर्ण ‘कसमादे’ परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. धार्मिक व भक्तिमय वातावरण असून, शहराचा पश्‍चिम भाग भगवे झेंडे, पताका व फलकांनी सजला आहे.

विविध मंदिरांमध्ये स्वच्छता, रोषणाई, रंगरंगोटी करण्यात आली. (Temples were cleaned illuminated and painted in city for ayodhya ram mandir nashik news)

शहरातील सकल हिंदू समाज व शिवसेनेतर्फे रविवारी (ता. २१) भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. श्रीराम रथ, नंदीस्वार शंकर-पार्वती, महाबली हनुमान, अघोरी पथक, ढोलपथक, मर्दानी खेळ व धुळे येथील आर-१ डीजे या शोभायात्रेचे आकर्षण असेल. सर्वत्र वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.

शहरातील कॅम्प भागातील मारवाडी गल्लीतील बालाजी राममंदिरातून दुपारी चारला शोभायात्रेला सुरवात होईल. कॅम्प, मेन रोड, मोची कॉर्नर, बाजार समिती, एकात्मता चौक, कॅम्प रोड, मोसम पूल चौक, महात्मा फुले रोड, संगमेश्‍वर या मार्गाने रामसेतूजवळील राम मंदिरात शोभायात्रेची समाप्ती होईल.

शोभायात्रा मार्ग भगवे झेंडे, पताका, झालर व विविध शुभेच्छा फलकांनी झळाळून निघाला आहे. शोभायात्रेची जय्यत तयारी करण्यात आली. शहरातील सकल हिंदू समाज बांधवांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संगमेश्‍वर सावता चौक भागातील श्रीराम मंदिरात सोमवारी सकाळी सातला श्रीराम मूर्ती महाभिषेक, दहाला रामरक्षा पारायण, सायंकाळी सातला दीपोत्सव, रात्री आठला महाआरती व महाप्रसाद, साडेनऊला भजन संध्या आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराचे विश्‍वस्त तथा मामको बँकेचे संचालक अशोक बैरागी, ज्ञानेश्‍वर बैरागी व अमर गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

यानिमित्त सावता चौकात देखणी सजावट करण्यात आली. स्मशान मारुती मळा मंदिरात रविवारी नवशक्ती मित्रमंडळातर्फे रामरक्षा पठण, महाआरती, कारसेवकांचा सन्मान, आनंदोत्सव व आतषबाजी होणार असल्याचे महंत धर्मदास महाराज यांनी सांगितले. श्‍याम गांगुर्डे, दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

रात्री बाराला होणार आतषबाजी

तीर्थक्षेत्र शनैश्‍वर मंदिरात शनिवारी (ता. २०) सकाळी महाआरती पार पडली. रात्री महाप्रसाद होणार आहे. याशिवाय रामनाम जप, सुंदरकांड पठण, हनुमान चालिसा व विविध कार्यक्रम होणार आहेत. येथील भारत मंडळ व भवानी व्यायाम शाळेतर्फे रविवारी महाआरती, कारसेवकांचा सत्कार, महाप्रसाद व रात्री बाराला फटाक्यांची आतषबाजी करण्यात येईल.

शहरातील रामसेतूजवळील रामबागमधील राम मंदिर व कॅम्पातील बालाजी राम मंदिरात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मामलेदार गल्लीतील राम मंदिरासह शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, रामरक्षा पठण, सुंदरकांड, भजन व विविध कार्यक्रम होतील.

रामराज्याचा आनंदोत्सव

रामबागेतील श्रीराम मंदिरात मंदिर उत्सव समितीतर्फे सोमवारी रामराज्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अश्‍वपती ढोलपथक, पेपर ब्लॉस्ट, दीपोत्सव, डीजे, लाईट शो व फटाक्यांची आतषबाजी हे असेल. सायंकाळी सहापासून या उत्सवाला सुरवात होईल.

संगमेश्‍वरातील नवनाथ मंदिरातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात महाआरती, छप्पनभोग प्रसाद, २१ फूट श्रीराम मूर्तीची थ्रीडी प्रतिमा दर्शन, फटाक्यांची आतषबाजी, दीपोत्सव, एलईडी शो व श्रीराम संगीत नृत्यकला होईल. सायंकाळी हा सोहळा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT