english school esakal
नाशिक

नामांकित इंग्रजी शाळांची राज्यात वाढणार संख्या

आदिवासी विकास विभागाने मागविले प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी स्वरुपाच्या नामांकित शाळांची संख्या वाढणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने शाळांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत शाळांना अर्ज करता येणार आहे.राज्यातील अनुसुचित जमातीमधील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकता यावे. यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने २०११ पासून आदिवासी विकास विभागातर्फे अनुसुचित जमातीमधील विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याची योजना सुरु केली आहे. आतापर्यंत राज्यातील १४३ नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून ५२ हजार विद्यार्थी या योजनेंतर्गत शिक्षण घेत आहेत.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागातर्फे या शाळांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या उद्देशाने प्रत्येक प्रकल्प कार्यालयांतर्गत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या काही उत्कृष्ट व दर्जेदार नामंकित निवासी शाळांची निवड केली जाणार आहे. त्याअनुषंगाने शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा चालविणाऱ्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या संस्थांकडून इयत्ता १ ली आणि २ री या सुरवातीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३१ जानेवारीपर्यंत शाळांना अर्ज करण्यासाठी मुदत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

शाळांसाठी असलेले निकष

  1. शैक्षणिक संस्था किमान ३ वर्षापासुन अस्तित्वात असावी. इंग्रजी माध्यमांची निवासी शाळा सुरु असावी

  2. धर्मदाय उपआयुक्त/ सहाय्यक आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत

  3. केलेली असावी

  4. शालेय शिक्षण विभागचा ना-हरकत दाखला असावा

  5. शाळांमधील १० वी, १२ वी वर्गाचे विविध बोर्डचे तीन

  6. वर्षाचे निकाल उत्कृष्ट असावे

  7. शाळांमध्ये मुला, मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह, मूलभूत सुविधा असाव्यात

  8. अन्नसुरक्षा व मानद कायद्यांतर्गत अन्न व औषध

  9. प्रशासनाचे प्रमाणपत्र असावे

  10. स्वतंत्र प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष,

  11. वैद्यकिय सोयी व सुरक्षा असावी

  12. सदर शाळेमध्ये बिगर आदिवासी विद्यार्थी प्रवेशित

  13. असणे आवश्यक आहे

  14. शासनाने ठरविलेल्या मानांकनाप्रमाणे कमीत कमी ६० गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुण असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT