नाशिक

Nashik Crime News: शहरात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र; पोलीस गस्ती नावालाच

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र लक्षणीयरित्या वाढले आहे. दुचाक्या चोरी तर नित्याचीच झालेली आहे.

वाढत्या चोऱ्यांमुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन दिवस रात्री पोलिसांची गस्ती आहे की नाही असाच प्रश्न उभा राहतो आहे. शहरात एक घरफोडी आणि दोन चोरीच्या घटनांमध्ये साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला गेला तर, ९० हजारांच्या तीन दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. (theft and burglary cases increasing in nashik crime news)

आडगाव येथील स्वामी समर्थनगरमध्ये घरातून ४० हजारांचा आयफोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. दीपक प्रभाकर विसपुते (रा. इच्छामणी अपार्टमेंट, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता. २५) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फ्लॅटचा दरवाजा उघडा असताना ॲपलचा आयफोन चोरीला गेला. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने सीबीएस येथे गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील २ लाख ४९ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. संतोष धनराज पाटील (रा. टाकळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.२४) ते पत्नीसह जुन्या सीबीएस येथे आले असता बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पर्समधील दागिने लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, सिडकोतील पाटीलनगर परिसरातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने ६९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

उज्ज्वलकुमार ज्ञानेश्वर वसाने (रा. पाटीलनगर, कोठावदेचौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार गेल्या १८ तारखेला मध्यरात्री सदरची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दुचाक्या चोरीला

महेश मुन्ना यादव (रा. चित्रकूट सोसायटी, म्हसरुळ) यांची ३० हजारांची ॲक्सेसे मोपेड (एमएच १५ जेबी ४२२०) गेल्या २१ तारखेला दिंडोरी रोडवरील भाजी मार्केट येथून चोरीला गेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिदास अमृता हिलीम (रा. राजमान्य सोसायटी, यशोदानगर, पेठरोड) यांची ३० हजारांची डिलक्स दुचाकी (एमएच १५ एफआर ८२५०) गेल्या १७ तारखेला मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश मुक्ताना सोनकांबळे (रा. पांडुरंग नगर, मथुरारोड, विहितगाव) यांची ३० हजारांची ॲक्सेस मोपेड (एमएच १५ एचबी ७८८२) गेल्या २२ तारखेला सकाळी सातच्या सुमारास आदर्श शिशुविहार येथून चोरीला गेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT