Special Inspector General of Police office esakal
नाशिक

Nashik Crime: विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय आवारात चोरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : गडकरी चौक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय आवारात गेल्या काही महिन्यात तीन ते चार चोरीच्या घडल्या आहे.

सोमवारी (ता.२३) सकाळी संरक्षण भिंतीच्या स्टीलच्या साखळ्या चोरी गेल्या. पोलिस विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांचेच कार्यालय रामभरोसे असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. (Theft in Special Inspector General of Police office premises Nashik Crime)

सोमवारी सकाळी ११ ते ११ वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान कार्यालयाच्या संरक्षण भिंतीस लावलेल्या तीन स्टीलच्या साखळ्या चोरी गेल्याची घटना घडली. पोलिस अंमलदार यश पवार यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी केली. संशयित साखळ्या चोरी करताना आढळून आला. पोलिस त्याचा शोध घेत असताना तोच संशयित मंगळवारी (ता. २४) पुन्हा कार्यालय बाहेर फिरताना श्री. पवार यांना आढळून आला.

पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली. त्याच्याकडून चोरीच्या साखळ्या मिळून आल्या. गणेश विजय गंधे (४०, रा. पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कार्यालय आवारातील चंदनाचे झाड चोरी जाणे, एसीची वायर चोरी होणे, भंगार चोरट्यांकडून लंपास करणे तर सोमवारी संरक्षण भिंतीच्या साखळ्या चोरी करण्याची घटना घडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना प्रवेशानंतर जयश्री जाधवांचं सतेज पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, 'त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही'

Pune Fire: पुण्यात पार्किंगवरुन वाद; माजी सैनिकाने झाडली गोळी; नेमकं काय घडलं?

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

SCROLL FOR NEXT