Theft esakal
नाशिक

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; टायर दुकानात धाडसी चोरी

पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान; टायर दुकानात धाडसी चोरी, 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

दिगंबर पाटाेळे

वणी (जि. नाशिक) : वणी-सापुतारा रस्त्यावरील पारख ट्रेडिंग कॉम्प्लेक्समधील अष्टविनायक एमआरएफ टायरच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील सर्व माल चोरट्यांनी लंपास केला. रविवारी (ता. ३१) रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

आयशर गाडीतून लांबविला चोरीचा माल

चोरट्यांनी एमआरएफ (MRF) टायर दुकानाच्या शटरची कडी तोडून, दुकानातील काचा फोडून आत प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडून टाकल्या व दुकानासमोर आयशर गाडी लावून सर्व टायर, टुलबॉक्स गाडीत भरून पसार झाले. सकाळी शेजारील दुकानदार नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने दुकानाचे मालक सचिन वाबळे यांना व्हिडिओ कॉलद्वारे माहिती दिली. ते तातडीने नाशिक येथून वणी येथे दुकानात आले. चोरी झाल्याची शहानिशा केल्यानंतर पोलिसांना माहिती कळविली. दुकानात एमआरएफ कंपनीचे ट्रक, ट्रॅक्टर, कार, दुचाकी असे सर्व प्रकारचे वाहनांचे टायर होते. सुमारे चार ते पाच लाखांपर्यंत माल असल्याची माहिती दुकानाचे मालक वाबळे यांनी दिली.

पोलिसांसमोर चोरट्यांनी उभे केले आव्हान

रात्री चोरी करण्यापूर्वी दोन व्यक्ती दुकानाच्या बाजूला असलेल्या हॉस्पिटलमध्ये फिरून आल्याचे हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांनी श्वानपथकास पाचारण करून चोरट्यांचा माघ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील दुकाने, रस्त्यालगतच्या दुकानांतील सीसीटीव्हीत काही धागेदोरे सापडतात का त्याचा तपासही सुरू आहे. पोलिसपथके तपासासाठी रवाना झाली आहेत. भररस्त्यावरील दुकानात चोरी झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. चार वर्षांपूर्वी रस्त्यालगत असलेल्या टायर दुकानात चोरी झाली होती. तेव्हाही दुकानातील सर्व माल साफ केला होता. त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत, तसेच पथदीप, मोठ्या शॉपिंग सेंटरसमोरील हायमास्ट बसविले पाहिजेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT