theft increasing in pimpalgaon nashik crime news esakal
नाशिक

Nashik News : चोरट्यांनो या, पिंपळगावात आपले स्वागत आहे! सुरक्षेचा कडलोट झाल्याने या गावात हा फलक लावणेच बाकी...

एस. डी. आहिरे

Nashik News : आठ दिवसांपूर्वी दुचाकीचे शोरूम फोडले, भरवस्तीत घरफोडी, अशा चोऱ्यांनी पिंपळगावकर धास्तावले असताना, चोरट्यांनी मोक्याच्या ठिकाणचे एटीएम फोडून २८ लाख रूपयांवर हात मारला.

चोरट्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. तोडक्या पोलिस बळामुळे चोरट्यांचे अधिकच फावत आहे. पिंपळगाव शहरातील चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने ‘चोरट्यांनो या, पिंपळगांवात आपले स्वागत आहे’, असा फलक लावणे शिल्लक राहिले आहे.

पिंपळगाव शहरातील व्यापार उदीम, आशिया खंडातील अग्रगण्य बाजार समिती, त्यातून उपलब्ध रोजगार, तीन तालुक्यांच्या केंद्रस्थानी असल्याने येथे नागरिक निवासाला पसंती देतात. (theft increasing in pimpalgaon nashik crime news)

‘मीनी दुबई’ अशी बिरूद लावलेल्या पिंपळगावमध्ये सर्व राष्ट्रीयकृत व खासगी बँका, बहुतांश पतसंस्थांच्या शाखा येथे आहेत. दररोज करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या पिंपळगाव शहरावर सध्या चोरट्यांची वाकडी नजर पडलेली दिसते. ठरावीक दिवसाच्या अंतराने घरफोड्या, दुकाने लुटण्याचा धडका चोरट्यांनी लावला आहे.

त्यामुळे पिंपळगाव पोलिसांचा चोरट्यांना धाक राहिला आहे का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. पोलिसांनी आता खाकीचा हिसका दाखविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी सिंगमचा अवतार धारण करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.

एकीकडे अवैध धंद्यांना चाप लावून पोलिसांनी जनतेची वाहवाह मिळविली असताना, चोरट्यांचा धुडगूस बोट ठेवायला जागा करीत आहे. पिंपळगावला रविवारच्या आठवडेबाजारात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांची टोळी मोबाईल लांबवत आहे.

सहा महिन्यांत २० हून अधिक ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी कार्यभाग साधला आहे. लाखो रुपयांचा ऐवज पळवित असताना, पोलिस त्यांना पकडू शकत नाही, असे विदारक चित्र आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोरट्यांनी सर्वांत मोठा डल्ला मारला तो शनिवारी पहाटे चिंचखेड चौफुलीवर एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन फोडून २८ लाखांवर डल्ला मारला. पिंपळगावाची लूट करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे एटीएम फोडण्याच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. पिंपळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेची वाट लागल्याचे चित्र आहे. चोरटे पोलिस व नागरिकांना टपली मारून जात आहे.

पोलिसांनी हिसका धाखवून वचक निर्माण नाही केला, तर चोरट्यांकडून खाकीची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ शकतात. कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचा धाक सर्वसामान्यांना नव्हे, तर चोरट्यांना वाटावा, अशी अपेक्षा आहे.

पिंपळगावच्या वृदांवणाऱ्या कक्षा, वाढत्या व्यापाऱ्याला गुन्हेगारीने ब्रेक लागण्याची भीती आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्याला अधिकारी- कर्मचाऱ्यांचा ३० वर्षांपूर्वीचा आकृतिबंध अजून तसाच आहे. लोकसंख्या मात्र चारपटीने वाढली आहे.

पिंपळगावसाठी सुधारित आकृतिबंध मंजूर करून पुरेस मनुष्यबळ उबलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न व्हायला हवेत. अवघे पाच अधिकारी व ४० पोलिस कर्मचाऱ्यांवर तीन लाख लोकसंख्येचा भार पेलणे अवजड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT