Crime esakal
नाशिक

Nashik Crime: श्रीराम मंदिराच्या जमिनीतून 5 लाखांच्या मातीची चोरी; निऱ्हाळे येथील प्रकार

अजित देसाई

Nashik Crime : सव्वाशे वर्षे पुरातन असलेल्या श्रीराम मंदिराच्या मालकीची इनामी जमीन असणाऱ्या शेतकऱ्याने या जमिनीतील पाच लाख रुपये किमतीची माती खोदकाम करून स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर विकण्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे फत्तेपुर या गावात घडला आहे.

ग्रामस्थांनी बैठक घेऊन या शेतकऱ्याला विचारणा केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देत ग्रामस्थांनाच दमात घेतल्याने त्याचे विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft of soil worth 5 lakhs from Shri Ram temple land Type from Nirhale Nashik Crime)

निऱ्हाळे फत्तेपुर गावात 1906 सालात स्थापन झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर आहे. या मंदिराच्या मालकीची गावचे शिवारात शेतगट नं 701 ही 7.39 हेक्टर जमीन आहे. मंदिर आणि जमिनीची मालकी गावकीच्या पंचमंडळाकडे आहे.

मात्र पंचमंडळातील सर्व सदस्य मयत झाल्यामुळे सद्यस्थितीत कोणतेही पंचमंडळ अस्तित्वात नाही. मात्र मंदिराची आणि जमिनीची व्यवस्था गावकीच्या माध्यमातून केली जाते. अडीच किंवा पाच वर्ष तोंडी कराराने गावातीलच स्थानिक कुटुंबाला शेतजमीन कसण्यासाठी खंडाने दिली जाते.

त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिराची देखभाल, दुरुस्ती आणि वार्षिक खर्च भागवला जातो. तीन वर्षांपूर्वी गावातील रहिवासी व भाजीपाला व्यवसायिक गोटीराम शंकर सांगळे यांना पाच वर्षाच्या खंडाने जमीन कसण्यासाठी देण्यात आली.

त्याबाबतचा निर्णय गावकीच्या बैठकीत घेण्यात आला होता. जमीन कसण्यासाठी देताना ग्रामस्थांनी बोली करताना श्री. सांगळे यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सदर जमीनीत पीक घेणे, मशागत करणे, नांगरणी करून पिक घ्यावे, सदर जमिनीत विहीर न खोदणे, सायपण न करणे, खड्डे न खोदणे, इतर कोणताही बदल न करणे, बांधावरील झाडे झुडुपे न तोडणे, शेत जमिनीतील माती, मुरूम, दगड न हलविणे इत्यादी तोडी सुचना दिल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तीन महिन्यांपूर्वी निऱ्हाळे फत्तेपुर शिवारात देवनदीतून निघणाऱ्या कुंदेवाडी ते सायाळे पूर चारीचे काम सुरू होते. मंदिराच्या मालकीच्या जमिनीतून ही चारी गेली. त्यासाठी सुमारे वीस फूट खोल चर खोदण्यात आला होता.

या चारीची लांबी सुमारे 1000 फूट इतकी असून त्यात पाच फूट व्यासाचे सिमेंट पाईप टाकून पूर्ववत बुजवण्यात आली होती. हे खोदकाम सुरू असताना आणि पाईप टाकून ते बुजवण्याचे काम होत असताना श्री. सांगळे यांनी ग्रामस्थांना माहिती देणे आवश्यक होते.

मात्र, त्यांनी या संदर्भात कोणालाही सांगितले नव्हते. खोदकाम दरम्यान निघालेली माती, मुरूम त्यांनी गावाची परवानगी न घेता परस्पर स्वतःच्या स्वार्थासाठी चोरून नेली. त्यासाठी चारीचे खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या जेसीबी यंत्रासह मालवाहू हायवा ट्रक आणि स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला.

मार्च व एप्रिल 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत श्री. सांगळे यांनी सुमारे 200 डंपर गौण खनिजाची चोरी करून विनापरवानगी वाहतूक केली. व हे सर्व साहित्य त्यांनी फत्तेपुर शिवारातील स्वतःच्या मालकीचे शेती गट क्रमांक 8 मध्ये भरवासाठी वापरले.

हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यावर श्री. सांगळे यांना वारंवार समज देऊन अशा पद्धतीने माती मुरूम चोरून न नेण्याचे सांगण्यात आले. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत उलट ग्रामस्थांनाच दमदाटी करायला सुरुवात केली.

त्यानंतर ज्ञानदेव केकाने, बाबासाहेब सहादु काकड, बाळासाहेब काकड, बाबासाहेब काकड, बबन देशमुख, संदीप देशमुख, देवीदास वाघ, आण्णा काकड यांचे सह ग्रामस्थांनी एकत्रितपणे मंदिराच्या मालकीच्या 701 गटातील जमिनीत जाऊन पाहणी केली असता तेथे जेसीबीच्या साह्याने मातीचे सुमारे सात ढीग बनवल्याचे लक्षात आले.

हे ढिगारे शेतात पूर्ववत पांगवून देण्यास सांगूनही सांगळे यांनी ऐकले नाही. उलट उर्मटपणे तुम्हाला काय करायचे ते करा असा दम ग्रामस्थांना भरला.

मंदिराच्या मालकी हक्काच्या जागेतील माती व मुरूम चोरी करून बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी अर्जुन त्रंबक केकान वय 60 यांनी गावाच्या वतीने वावी पोलीस ठाण्यात गोटीराम सांगळे यांच्या विरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी याप्रकरणी मंदिराच्या मालकीच्या जमिनीतून खोदकाम करून माती आणि मुरमाची चोरी केल्याप्रकरणी श्री. सांगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT